Join us

'हाऊसफुल 4': कॉमेडीचा फुसका 'बार !

By सुवर्णा जैन | Published: October 25, 2019 3:27 PM

'हाऊसफुल्ल' या चित्रपटाच्या सीरीजचा हा चौथा भाग असल्याने त्यामुळे रसिकांना नेहमीप्रमाणे त्याची प्रतीक्षा रसिकांना होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 'हाऊसफुल्ल-4' रसिकांच्या भेटीसाठी दाखल झाला. 

Release Date: October 25, 2019Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृति सेनन, पूजा हेगड, कृति खरबंदा
Producer: साजिद नाडीयाडवालाDirector: फरहाद सामजी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

 

चित्रपटात पुर्नजन्माची कहाणी ही हिंदी चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी काही नवीन नाही. याआधी 'कर्ज', 'प्रेम' अशा अशा विविध चित्रपटांत पुनर्जन्माची कहाणी रसिकांनी पाहिलीय. मात्र आता आणखी एक पुनर्जन्माची कहाणी रसिकांच्या भेटीला आली आहे. मात्र ही कहानी आधीच्या चित्रपटांप्रमाणे प्रेमकहाणी किंवा बदला घेणारी नसून ती रसिकांना खळखळून आणि पोट धरून हसवणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत 'हाऊसफुल्ल-4' या चित्रपटाची उत्सुकता होती. 'हाऊसफुल्ल' या चित्रपटाच्या सीरीजचा हा चौथा भाग असल्याने त्यामुळे रसिकांना नेहमीप्रमाणे त्याची प्रतीक्षा रसिकांना होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 'हाऊसफुल्ल-4' रसिकांच्या भेटीसाठी दाखल झाला. 

'हाऊसफुल्ल-4' चित्रपटाची कथा सुरू होते चित्रपटाचा नायक हॅरी (अक्षय कुमार)याच्यापासून. हॅरी हा केशकर्तनकार असून त्याचा कधी कधी गझनी होतो अर्थात त्याला विसरण्याची सवय आहे. त्याला मॅक्स (बॉबी देओल) आणि रॉय (रितेश देशमुख) असे दोन भाऊ आहे. या तिघा भावांनी धनाढ्य बापाच्या मुलींना पटवलंय. या तिघींसोबत लग्न करण्यासाठी हे तिघे भाऊ लंडनहून सीतमगढ इथं जायचं ठरवतात. इथूनच तुफान कॉमेडी, धम्माल मस्तीला सुरूवात होते. 'हाऊसफुल्ल' चित्रपटाच्या आधीच्या सीरीजप्रमाणे कॉमेडी पंचेस, मूर्ख वाटाव्या अशा योजना असं सारं काही हाऊसफुल्ल-4मध्ये पाहायला मिळंत. 

सीतमगढमध्ये जिथे हे सारे भेटतात त्याच जागी हे सर्व जण सहाशे वर्षांपूर्वी भेटलेले असतात. 2019 च्या प्रेमकथेला 1419 सालच्या प्रेमकथेला जोडताना होणारी धम्माल मस्ती या चित्रपटाच्या पूर्वाधात रसिकांचं तुफान मनोरंजन करते. 1419 सालच्या प्रेमकथेत अक्षय कुमारने साकारलेला कुप्रसिद्ध बाला ही व्यक्तीरेखा रसिकांची तुफान दाद मिळवून जातो. चित्रपटाचा पूर्वाध वेगवान, तुफान विनोदी आणि पंचेसचा असला तरी उत्तरार्धात चित्रटाची कथा काही संथ वाटते. हाऊसफुल्ल चित्रपटाची सीरीज म्हणजे धांगडधिंगा असतो. मात्र 'हाऊसफुल्ल-4' त्याला अपवाद ठरतो. यांत 600 वर्षे जुन्या प्रेमकथेचं काय होतं? 1419 साली अपूर्ण राहिलेली प्रेमकथा 2019मध्ये पूर्ण होते का? या सगळ्याची उत्तरं या चित्रपटात मिळतील.चित्रपटात साऱ्याच कलाकारांच्या भूमिका धम्माल आहेत. मात्र सगळ्यात जास्त भाव खाऊन जातो तो अक्षय कुमार. त्याने साकारलेला प्रिन्स बाला रसिकांचं तुफान मनोरंजन करतो. याशिवाय रितेश, बॉबी देओल यांच्याही भूमिका रसिकांना भावतात. कृती सॅनॉन, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा या ग्लॅमरस दिसल्यात. मात्र त्यांच्या वाटल्या फारशी मोठी भूमिका आलेली नाही. बऱ्याच काळानंतर जॉनी लिव्हरची चित्रपटात धम्माल पाहायला मिळते. राणा डुग्गुबातीची भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी वाटते. 

चित्रपटात जेव्हा 1419 सालचा काळ दाखवला गेला आहे तो सेट पाहताना 'बाहुबली' चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण हा सेट अगदी बाहुबली चित्रपटासारखा भव्यदिव्य भासतो. फरहाद सामजी यांच्या दिग्दर्शनात कमाल केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक नक्कीच करायला हवं. चित्रपटाचं संगीत चांगलं आहे. त्यामुळे दिवाळीत निव्वळ धम्माल मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल तर हा चित्रपट एकदा पाहायला काहीच हरकत नाही. 

टॅग्स :अक्षय कुमारहाउसफुल 4