Join us

Manikarnika: The Queen of Jhansi Movie Review : 'वो खूब लडी मर्दानी' कंगना ठरली जिगरबाज राणी

By गीतांजली | Published: January 24, 2019 8:49 PM

सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई).

Release Date: January 25, 2019Language: हिंदी
Cast: कंगना राणौत, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी जिशू सेनगुप्ता, सुरेश ऑबेरॉय, डॅनी डेंझपा, वैभव तत्वावादी
Producer: कमल जैन Director: क्रिश आणि कंगना राणौत
Duration: 2 तास 35 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्यासमोर येते ते तिचे मुलाला पाठीला बांधून रणांगणात इंग्रजांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या मर्दानी रुप. इतिहासाच्या पानावर त्यांच्या अनेक शौर्यगाथा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच सिनेमाच्या माध्यमातून झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला आली आहे. हे शिवधनुष्य उचलण्याचे काम केले आहे बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिने. कंगनाचा बहुचर्चित अनेक वादात अडकलेला  सिनेमा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

सिनेमाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजाने होते जी तुम्हाला आमीर खानच्या लगानची आठवण करुन देते. मग वाराणसीच्या मणी घाटावर जन्म होतो तो मणिकर्णिकेचा (राणी लक्ष्मीबाई). मणिकर्णिकाच्या जन्माच्यावेळी ती इतिहासांच्या पानावर आपले नाव कोरेल अशी भविष्यवाणी केली जाते. मनुचे वडील पेशवांच्या दरबारात सल्लागार म्हणून काम करत असतात. त्यामुळे ती लहानाची मोठी राजवाड्यातच होते. मनु वेद-पुराण, घोडस्वारी आणि तलावर बाजीमध्ये तरबेज असते. झाशीमधल्या राजे गंगाधर राव यांच्याशी मनुचा विवाह होतो आणि इथून पुढे सुरु होते ती मनुच्या मणिकर्णिका ते झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या प्रवासाला सुरुवात. झाशीत आल्यावर मणिकर्णिका इंग्रजांविरोधात लढा उभारते. लग्नानंतर काही महिन्यात राणी लक्ष्मीबाईंना आई होणार असल्याची चाहुल लागते. दामोदर नावाच्या गोंडस बाळला त्या जन्म देतात. मात्र काही दिवसांतच दामोदरचा मृत्यू होतो. दमादोरच्या मृत्यूनंतर गंगाधर राव आणि लक्ष्मीबाई गादीला वारसदार हवा म्हणून मुलाला दत्तक घेतात. त्यानंतर काही दिवसांनी गंगाधर राव यांचादेखील मृत्यू होतो. राणी लक्ष्मीबाईंना इंग्रज त्यांच्याच महालातून बाहेर काढतात. त्यानंतर सुरुवात होते ती पहिला स्वातंत्र्य संग्रामाला. राणी लक्ष्मीबाई इंग्रजांविरोधात मैदानात उतरते. ती युद्ध पुकारते. यायुद्धात तिला साथ मिळते ती झलकारी बाई, (अंकिता लोखंडे) तात्याराव टोपे (अतुल कुलकर्णी), पुरण सिंग(वैभव तत्तवादी) आणि गुलाम मोहम्मद खान (डॉनी डेंझोपा) यांची. 

सिनेमाचा पहिला भाग तुम्हाला निराश करतो. कंगनाची डायलॉग डिलीवरी फारच कमजोर आहे. सिनेमात गाण्याचा भडीमार केला आहे तर दोन मिनिटांनी गाणं सुरु होते. त्यामुळे सिनेमा कंटाळवाणा वाटू लागतो. एका दृष्यात झलकारी बाईचे इंग्रजांनी नेलेले वासरु कंगना परत नेऊन देते आणि याठिकाणी अचानक गाणं सुरु होते याचा सिनेमा पाहताना कुठेही संदर्भ लागत नाही. मध्यंतरानंतर सिनेमा चांगली पकड घेतो. सिनेमाचा सेट तुम्हाला संजय लीला भन्सांली यांची आठवण करुन देतो. शंकर, एहसान लॉय यांच्या संगीताने फारशी काही कमाल दाखवू शकलेले नाही. अभिनयाबाबत बोलायचे झाले तर पहिल्या भागापेक्षा मध्यंतरानंतर कंगनाचा अभिनय खुलून आला आहे. देशसेवेत आपले प्राण पणाला लावणारी, तलवारबाजी करणारी, मांडीवर बाळाला घेऊन राजगादी सांभाळणारी कंगना या सिनेमाची जान आहे. बाकी अतुल कुलकर्णी जिशू सेनगुप्ता, सुरेश ऑबेरॉय, डॅनी डेंझपा, वैभव तत्वावादी आणि अंकिता लोखंडे यांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. अंकिता लोखंडेने या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. कंगना चा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. पण त्या मानाने ही कथा तिच्यासाठी शिवधनुष्यच होती. पण हा शिवधनुष्य पेलण्यात कंगना काही प्रमाणात यशस्वी ठरली असे नक्कीच म्हणता येईल.  सिनेमातील  'खूब लडी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी' किंवा 'मैंने रहु ना रहु भारत रहैना चाहिए' असे डायलॉग अंगावर शहारे आणतात. याशिवाय असे अनेक कंगनाचे असे अनेक डायलॉग आहेत ते सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्टया वाजवायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत अनेक वेळा पुस्तकातून वाचलेला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहणे हा खरंच एक रोमांचकारी अनुभव ठरतो. त्यामुळे सिनेमा एकदा तरी थिएटरमध्ये जाऊन पाहावा असाच आहे.  

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीकंगना राणौतअंकिता लोखंडेअतुल कुलकर्णीवैभव तत्ववादी