‘मोह माया मनी’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2016 3:57 PM
‘मोह माया मनी’ सिनेमा यापूर्वी 2015 मध्ये एनएफडीसी फिल्म बाजार, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आणि लंडन इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला आहे.
मुनीश भारद्वाज दिग्दर्शित 'मोह माया मनी' सिनेमा एका मिडल क्लास जीवन जगत असणा-या जोडप्याची कथा आहे.रणवीर शौरी सिनेमात अमन नावाची भूमिका साकारतोय. अमन हा एका मल्टीनॅशल कंपनीत रिअल एस्टेट ब्रोकर म्हणून काम करत असतो. कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी तो त्याच्या कपंनीत त्याच्या बॉसला न सांगता रघुवीर नावाच्या डीलरच्या मदतीने एक मोठा व्यवहार करतो. या व्यवहारातून त्याला मोठा फायदा होतो.यांतून मिळालेल्या पैशांतून तो त्याच्या पत्नीसह ऐशोआरामचे जीवन जगायाल सुरूवात करतो. मात्र दिवसानंतर पुन्हा त्याच्या आयुष्यात एक वादळ येते. यामुळे पुन्हा त्याला काही नुकसान होऊ नये यासाठी तो त्याच्या पत्नी दिव्या( नेहा धुपिया) लाही त्याच्या कट कारस्थानात सहभागी करून घेतो. त्यानंतर एकापाठोपाठ घडणा-या गोष्टी सिनेमात मांडण्यात आल्या आहेत. ‘मोह माया मनी’ सिनेमा यापूर्वी 2015 मध्ये एनएफडीसी फिल्म बाजार, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल आणि लंडन इंडियन फिल्म फेस्टीवलमध्ये दाखवण्यात आला आहे.