Join us

Mom Review : ...अशीही असते आई!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2017 7:47 AM

​२०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. वास्तविक चित्रपटाची कथा फार विलक्षण किंवा अद्वितीय नाही.

Release Date: July 07, 2017Language: हिंदी
Cast: कलाकार : श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीका, अक्षय खन्ना, अदनान सिद्दीकी, अभिमन्यु सिंग, सज़ल अली आदी.
Producer: बोनी कपूर, सुनील मनचंदाDirector: रवी उदयवार
Duration: वेळ : २ तास २७ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
जान्हवी सामंत२०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. वास्तविक चित्रपटाची कथा फार विलक्षण किंवा अद्वितीय नाही. कारण काही महिन्यापूर्वीच रिलीज झालेल्या अभिनेत्री रविना टंडन हिच्या ‘मातृ’ या चित्रपटाशी काहीशी साम्य साधणारी आहे. मात्र अशातही चित्रपटातील अभिनय, संगीत आणि कथेतील भक्कमपणा चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो, हेही तेवढेच खरे आहे. चित्रपटाची कथा कॉलेज शिक्षिका देवकी सभ्रवाल (श्रीदेवी) आणि तिची सात्र मुलगी आर्या (सजल अली) हिच्या अवतीभोवती फिरणारी आहे. बायोलॉजीची शिक्षिका असलेली देवकी आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारी असते. दिल्ली येथे दोन मुली आणि नवºयाबरोबर राहणाºया देवकीचे वैवाहिक जीवन खूपच सुखी असते. देवकीची आर्या नावाची मोठी मुलगी तिच्या नवºयाच्या पहिल्या बायकोची असते. मात्र अशातही देवकी तिच्यावर पोटच्या मुलीप्रमाणेच प्रेम करीत असते. ती १८ वर्षाची असल्याने तिच्याविषयी ती नेहमीच सजग असते. परंतु आर्याला तिची सावत्र आई फारशी आवडत नसते. मुळात देवकीबरोबर तिच्या वडिलांनी (अदनान सिद्दीकी) केलेला विवाहच तिला खटकणारा असतो. एक दिवस आर्या तिच्या मित्रांबरोबर व्हॅलेंटाइन डेच्या पार्टीला जाते. याठिकाणी मोहित नावाचा मुलगा आणि त्याचे काही सहकारी तिची छेड काढतात. वास्तविक मोहित तिला यापूर्वी देखील अश्लिल मॅसेजेस पाठवित असतो. मोहितचे हे वागणे तिला अजिबात आवडत नाही. ती त्याला विरोध करते. परंतु याचाच राग मनात ठेवून मोहित आणि त्याचे सहकारी आर्याचे अपहरण करतात. तिच्यावर सामुहिक बलात्कार करून जखमी अवस्थेत तिला एका नाल्यात फेकुन देतात. पुढे हे प्रकरण न्यायालयात जाते. परंतु पब्लिसीटीच्या जोरावर मोहित खटला जिंकतो. न्यायावरचा विश्वास उडालेली ‘मॉम’ गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निश्चिय करते. यासाठी ती एका डिटेक्टिव्ह दयाशंकर कपूर (नवाजुद्दीन सिद्दीकी) याची मदत घेते. पुढे मॅथ्यू फ्रांसिस (अक्षय खन्ना) या पोलीस अधिकाºयाचीही एंट्री होते. त्यानंतर कथेत काय ट्विस्ट येत असतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वास्तविक चित्रपट दोन्ही भागात प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. यामध्ये दिग्दर्शक रवी उदयवार याच्या दिग्दर्शनाचा मोठा वाटा म्हणावा लागेल. कारण साधारण संवाद अतिशय मनोरंजकपणे सांगण्यात तो यशस्वी होताना दिसतो. श्रीदेवी आणि नवाजुद्दीन यांचे मोजकेच सीन्स असतानाही त्याला ज्या पद्धतीने सादर केले गेले ते वाखण्याजोगे आहे. वास्तविक नवाजुद्दीन आणि अक्षय खन्ना यांच्या वाट्याला खूपच कमी भूमिका आली आहे. अशातही हे दोन्ही कलाकार बाजी मारून जाताना दिसतात. मात्र चित्रपटाचा खरा नायक हा अभिनेत्री श्रीदेवीच आहे, यात काहीही शंका नाही.