movie review : ‘मंत्रा’ म्हणजे सगळचं ‘जड’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 9:26 AM
मंत्रा या सिनेमात कल्की कोच्लिनने १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारली आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित या चित्रपटात कल्कीसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
या सिनेमात कल्की कोच्लिनने १९९०च्या दशकातील वडिलांचा व्यवसाय हाती घेणा-या मुलीची भूमिका साकारली आहे.निकोलस खारकोंगर दिग्दर्शित या चित्रपटात कल्कीसह लुशीन दुबे, शिव पंडित, रोहन जोशी, रजत कपूर व आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.उदारीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज यांच्यात अनेक वैचारिक आणि व्यावहारिक बदल झालेत. यावर सिनेमा काढणे, हे खरचं धाडसाचे काम आहे. दिग्दर्शकाने हे आव्हान शिरावर घेतले खरे, पण दुर्दैवाने हे आव्हान पेलण्यात त्याला अपयश आले. उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट खरोखरच खूप मनोरंजक बनू शकला असता. लिंग भेद, उत्त्पन्नातील तफावत, स्थलांतराची समस्या, शहरीकरण यासारखे विषय या चित्रपटात अतिशय संवेदनशीलपणे दाखवले आहेत. पण या मुद्यांची मांडणी करताना मात्र चूक झालीय.सन २००० ची पार्श्वभूमी असलेला ‘मंत्रा’ हा सिनेमा दिल्लीत स्थायिक व्यापारी कपिल कपूर (रजत कपूर)आणि त्याच्या कुटुंबाची गोष्ट आहे. कपूरचा ‘किंग चिप्स’नावाचा वेफर्सचा यशस्वी ब्रॅण्ड असतो. पण अशातच ‘किपर चिप्स’ हा एक मल्टिनॅशनल ब्रॅण्ड बाजारात उतरतो. या बॅण्डच्या एन्ट्रीमुळे कपूरचा बिझनेस बंद पडायच्या मार्गावर येतो. कपूर हे सगळे डोळ्यांनी बघत असतो. पण बिझनेस सावरायचा कसा, हे त्याला कळत नसते. याऊलट त्याचा मुलगा विराज (शिव पंडित) आणि मुलगी पिया(कल्की कोच्लिन) या दोघांनी सुरु केलेले नवीन रेस्टॉरंट पब मात्र चांगले भरभराटीला आलेले असते. दुसरीकडे कपूरचा लहान मुलगा एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात अडकतो. यासोबतच कपूर कुटुंबात एकापाठोपाठ एक अशा अनेक घटना घडतात आणि या घटना कपूर कुटुंबातील भांडणास कारणीभूत ठरतात. एक हसत-खेळत राहणारं कुटुंब उद्वस्त व्हायला लागतं. अर्थात सरतेशेवटी व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्यातील सगळ्या आव्हांनाना तोंड देत कपूर कुटुंब पुन्हा जवळ येतं. याच भोवती चित्रपटाची अख्खी कथा फिरते.‘मंत्रा’ हा चित्रपट खूप जड विषयावर प्रकाश टाकतो. पण हे करताना दिग्दर्शक या विषयाचा भार पेलू न शकण्याने एकूणच चित्रपट डोईजड व्हायला लागतो. इंग्रजीतले संवाद चित्रपटाला आणखी ‘जड’ करतात. हे सगळे संवाद सामान्य पे्रक्षकांला कृत्रिम वाटतात. दमदार कलाकार असूनही चित्रपटाची मांडणीच चुकल्याने हा चित्रपट कंटाळवाणा वाटू लागतो. गंभीर विषय असल्याने हा कंटाळा आणखीच वाढतो. सरतेशेवटी काय तर ‘मंत्रा’ नाही पाहिला तरी भागू शकतं.
-जान्हवी सामंत ‘मंत्रा’