जान्हवी सामंतवादात अडकलेला सिनेमा आणि प्रदर्शित होण्याआधीच चर्चेचा विषय ठरलेला 'पद्मावत' पाहिल्यानंतर हा एक केवळ मनोरंजन करणारा सिनेमा असून यात असे विरोध करण्यासारखे काहीच दिसून येत नाही.राजकीय वक्तव्यानुसार हा सिनेमा पाहावा की पाहू नये हे रसिकांनीच ठरवलेले उत्तम.सोप्या शब्दात सांगायचे झाले तर " एक बार तो देखना बनता है बॉस" सर्व वाद बाजूला ठेऊन हा सिनेमा बघितला तर संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या विचाराने मांडलेली एक ऐतिहासिक कथा आहे. खरच या सिनेमात असे काही नाही की ज्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या भावना दुखावल्या जातील आणि कुठल्याही ऐतिहासिक गोष्टीची छेडछाड होईल अशी सिनेमात एकही गोष्ट नसून फक्त एक खुपण्या सारखी गोष्ट आहे ती म्हणजे "सती" पद्धतीला दिले गेलेलं प्रोत्साहन.ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याला राजपूत संस्कृतीची झलक तसंच रणभूमीतील युद्ध आणि षडयंत्र या सगळ्याचा संगम म्हणजे पद्मावत. संजय लीला भन्सालीच्या सिनेमाला साजेसा भव्यदिव्यपणा,सारं काही डोळे दिपवणारं मात्र कथेतील आणि व्यक्तीरेखांमध्ये भावनांचा अभाव यामुळे 'पद्मावत' सिनेमा कुठेतरी झाकोळला जातो. 'रामलीला' सिनेमातील क्रूरता आणि 'बाजीराव मस्तानी'मधील भव्यदिव्यता यांचं मिश्रण 'पद्मावत' या सिनेमात पाहायला मिळतं.संजय लीला भन्साली यांचा 'पद्मावत' हा सिनेमा मध्यकालीन कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या महाकाव्यावर आधारित आहे.अलाउद्दीन खिलजी याचं चित्तौडची राणी पद्मावतीवरील प्रेम तसंच राणीला आपलंसं करण्यासाठी आणि मेवाडचं साम्राज्य मिळवण्यासाठी तो काय काय करतो याच्या अवतीभवती 'पद्मावत' सिनेमाचं कथानक फिरतं. आलाउद्दिन खिलजी हा एक क्रूर योद्धा होता त्याने राज्यासाठी आपल्या स्वतःच्या काकांचा खून केला होता आणि त्याला त्याचे काही वाईट वाटत नव्हते इतकेच नव्हे तर तो हिंद स्वराज्यावर राज्य करू पाहत होता तो युद्धात जिंकलेल्या राज्यातील स्त्रियांवर अत्याचार करत असे.महाराज रावल सिंग (शाहिद कपुर) हा एक न्यायनिष्ठ आणि कर्तव्यशील राजा होता आणि या उलट आलाउद्दिन खिलजी होता,खिलजी युद्ध जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जात असे. त्याच्यासाठी युद्ध जिंकणे हेच त्यांचे उद्दिष्ट असायचे.तो कधीच न्याय - अन्याय या गोष्टींचा विचार करत नसे.दिल्ली सलतनत मधील मेवर हे एक छोटेसे राज्य पण राजपूत घराण्याने प्रभावित 'सिंघल' राज्याला भेट देत असताना राजा रावल सिंग ची भेट 'सिंघल' राज्याच्या राणी 'पद्मावती'शी होते व तो तिच्या प्रेमात पडतो पुढे तो तिच्याशी लग्न करून तिला मेवाड राज्यात घेऊन येतो नंतर राणी पद्मावती तिच्या युक्तिवादाने व सौंदर्याने सगळ्यांच्या पसंतीस पडते.पद्मावतीच्या सौंदर्याची बातमी खिलजीला मेवाड राज्याशी फितुरी केलेल्या एका राज्य सल्लागारकडून मिळते.पद्मावती चे सौंदर्य पाहण्याच्या इच्छेने खिलजी राजा रावल सिंगला पाहुणचारसाठी दिल्ली मध्ये येण्याचे आमंत्रण देतो.राजाला आमंत्रण देऊन त्याच्या वर हल्ला करून त्याचे मेवाड राज्य बळकवण्याचा त्याचा मनसुबा असतो पण राजा रावल सिंग त्याचे आमंत्रण नाकारतो.पण खिलजीला काही केल्या 'पद्मावती'ला पहायचे असते त्यासाठी युद्ध सुरू होण्याच्या अाधीच तो स्वतः राजा रावल सिंगच्या महालात भोजनासाठी येतो आणि खिलजी राजा पुढे 'पद्मावती'ला पाहण्याची इच्छा व्यक्त करतो.यावर राजा संतापून खिलजीला महालातून जाण्यासाठी सांगतो पण युद्ध टाळण्यासाठी पद्मावती खिलजी समोर येण्यासाठी तयार होते. ती त्याला आपले रूप आरश्यातून दाखवते पण खिलजी त्याने तृप्त होत नाही म्हणून तो राजा रावल सिंगला बंदी बनवतो आणि दिल्लीला नेतो. तसेच अशी अट ठेवतो की जर पद्मावती दिल्ल ला आली तरच राजा रावल सिंगची सुटका होईल.मेवाडच्या राजाला परत आणण्यासाठी पद्मावती कशी दिल्लीला पोहचते आणि खिलजीशी युद्ध करते हेच या सिनेमाच्या कथेचा मुख्य भाग आहे.या सिनेमातील इतर व्यक्तीरेखेबद्दल बोलायेच झाले तर 'गफूर' हे पात्र आणि त्याने साकारलेली समलैंगिक भूमीका त्याच बरोबर गुरू राघव चेतन हे पात्र या पद्मावतीच्या ठळक व्यक्तिरेखा आहेत.सिनेमाला पूर्णपणे भन्साळी टच आहे भव्यदिव्य सेट,रंगाने भरपूर साजरी केलेली होळी,रणवीर सिंगचे नृत्य आणि 'घुमर' हे सर्व 'पिंगा','डोला रे डोला' या गाण्याची आठवण करून देतात.या सिनेमाचा क्लायमॅक्स देखील 'बाजीराव मस्तानी' आणि देवदास सारखा लांबवला गेला आहे.आणि नवल म्हणजे जरी रावल सिंग आणि राणी पद्मावत सिनेमाचे मुख्य पात्र असले तरी खिलजीचे पात्र जास्त वरचढ दिसून येते.हा सिनेमा पाहावा की पाहु नये या नक्की सांगता येणार नाही पण राजपुतांचे 'बाहुबली' व्हर्जन पहायचं असेल तर 'पद्मावती' जरूर पाहा.