Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी

By प्राजक्ता चिटणीस | Published: September 6, 2018 05:15 PM2018-09-06T17:15:17+5:302018-09-07T17:56:04+5:30

पार्टी या चित्रपटात चित्रपटात स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला आणि सुव्रत जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी | Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी

Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी

googlenewsNext
Release Date: September 07,2018Language: मराठी
Cast: स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला आणि सुव्रत जोशी
Producer: जितेंद्र रमेश चीवलेकर, जमाश्प बापुना, अमित पारेखDirector: सचिन सुरेश दरेकर
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

मैत्रीवर आजवर बॉलिवूड, मराठीत अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्याच पठडीतील पार्टी हा सिनेमा आहे. मित्र, त्यांची मजा-मस्ती, त्यांच्यात निर्माण झालेला गैरसमज, दुरावा या आजवर चित्रपटात वापरण्यात आलेला फॉर्मुला या चित्रपटात देखील वापरण्यात आलेला आहे. पण या चित्रपटाची मांडणी वेगळी असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करतो.

ओमकार (सुव्रत जोशी), सुमीत (स्तवन शिंदे), चकऱ्या (अक्षय टंकसाळे), मनोज (रोहित हळदीकर) हे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असतात. मजा-मस्ती करणे, दारू पिणे, मुली फिरवणे या गोष्टी त्यांच्यासाठी गोष्टी नित्यनियमाच्या झालेल्या असतात. सुमीतचे क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न असते आणि त्यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो तर दुसरीकडे ओमकार हा श्रीमंत असतो. त्याला कसलीच कमतरता नसते. चकऱ्या आणि मनोजच्या घराची आर्थिक परिस्थिती देखील बेताची असते. पण तरीही शिक्षण, पैसा कमवणे या गोष्टींचा दूरदूरपर्यंत देखील ते विचार करत नसतात. स्तवनच्या आयुष्यात अनेक मुली आलेल्या असतात. पण नातेसंबंधांकडे तो कधीच गांभीर्याने पाहात नाही तर याउलट ओमकार आणि चकऱ्या यांच्या दोघांच्या आयुष्यात त्यांच्या प्रेमाला प्रचंड महत्त्व असते. ओमकारचे प्रेम अपर्णा (प्राजक्ता माळी) तर चकऱ्याचे प्रेम दिपाली (मंजेरी पुपाला) वर असते. आयुष्य हे केवळ एन्जॉयमेंटसाठी असते असे मानणाऱ्या या मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या एका घटनेने त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे कशी कलाटणी मिळते? त्यांच्या आयुष्यात काय होते? या सगळ्यात त्यांची मैत्री टिकून राहाते की नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पार्टी हा चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

पार्टी या चित्रपटाची कथा चांगली जमून आली असून दिग्दर्शक सचिन सुरेश दरेकर यांनी चांगल्याप्रकारे ती मांडली आहे. चित्रपटात आता पुढे काय होणार याची उत्सुकता नक्कीच लागून राहाते. तसेच चित्रपटातील काही दृश्य प्रेक्षकांना नक्कीच खळखळून हसवतात. चित्रपटात स्तवन शिंदे, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला आणि सुव्रत जोशी यांनी चांगले काम केले आहे. पण काही दृश्यांमध्ये सुव्रत ओढूनताणून अभिनय करत असल्याचे जाणवते. तसेच चित्रपटाचा शेवट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपट संपल्यानंतरही काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. चित्रपटाची गाणी चांगली झाली आहेत. एकंदरीत तुमच्या फ्रेंड्ससोबत या पार्टीची मजा लुटायला हरकत नाही. 

Web Title: Party Marathi movie Review : फूल टू धमाल पार्टी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.