जितेंद्र कुमार
दिग्दर्शक विनोद कापडीने समाजात वाढत असलेल्या पती-पत्नींच्या बिघडलेल्या नात्याचा मुलांवर पडणाऱ्या परिणामावर ‘पीहू’ हा असा चित्रपट बनविला आहे, जो आपल्या डोळ्यात अंजन घालतो. या चित्रपटास फिल्म फेस्टिव्हलमध्ये खूपच प्रशंसा मिळाली आहे आणि हा एक एक्सपेरिमेंटल चित्रपट आहे. जेव्हा पती-पत्नी भांडण करतात तेव्हा त्याचा मुलांच्या मनावर काय परिणाम होतो आणि त्यांच्या व्यवहारात काय बदल घडतो यावर काहीही चर्चा होत नाही. मात्र पीहू एवढी लहान आहे की, ती आपल्या आईच्या शवाकडून खाणे-पिणे मांगते. तिची निरागसपणा दर्शवणारी ही कहाणी समाजाला काही प्रश्न विचारते की, त्यांच्या भांडणात का बालपण हिरावले जात आहे?
या कहाणीची सुरुवात होते २ वर्षाची मुलगी ‘पीहू’ (मायरा विश्वकर्मा) पासून जी आपल्या घरात आईच्या शवासोबत राहते. तिचे वडिल एका कामासाठी दोन दिवसासाठी कोलकाता गेलेले असतात. गेल्या रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते ज्यामुळे पूजा (प्रेरणा शर्मा) झोपेच्या गोळ्या सेवन करु न आत्महत्या करुन घेते. मात्र पीहू समजते की, आई जिवंत आहे आणि झोपली आहे. आणि ती आईकडून जेवण मागते, दूध मागते, मात्र काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वत: जाऊन खाण्यापिण्याचे पदार्थ शोधून आणते. पुन्हा कसेतरी गेल्या रात्रीचे उरलेले पदार्थ मिळताता आणि ती खाते. वडिलांचा फोन येतो तर निरागसतेने बोलते की, आई झोपली आहे. चपाती शेकण्यासाठी ती गॅस पेटवते, ओव्हेन चालवते तर चपाती जळून जाते. नेमके काय होते घरात, काही अपघात होतो का, पिहूचे नेमके काय होते, हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. दिग्दर्शक विनोद कापडीच्या या एक्सपेरिमेंटल चित्रपटाची प्रशंसा व्हायला हवी. त्यांनी विना स्टारकास्ट हा चित्रपट बनविला आहे आणि यात कोणत्याही स्टारची गरजही नव्हती. मायरा विश्वकर्माने पीहूची भूमिका एवढी सहजतेने साकारली आहे की, आपण तिच्याशी जवळीकता साधू इच्छिणार आणि तिच्याशी आपणास सहानुभूतिही होईल. शवाच्या रुपात विना हालचाल करता पडून राहून प्रेरणा शर्माने काय अभिनय केला आहे, यावर चर्चा करण्याचे खास कारण नाही मात्र तिने काहीही हालचाल केली नाही हे विशेष. यात तसे कॅमरामॅन आणि दिग्दर्शकाचे योगदानही होते. ही एक २ वर्षाच्या मुलीची अशी कहाणी आहे जी प्रत्येक घराची होऊ शकते. मनोरंजन सोडले तर सामाजिक संदेशाच्या रुपातच या चित्रपटाकडे पाहिले जाऊ शकते.