Join us

Sacred Games Review : बॉलिवूडसाठी धोक्याची घंटी असलेला मस्ट वॉच ‘सेक्रेड गेम्स’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 4:27 PM

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान या दोघांची 'सेक्रेड गेम्स' ही एक रोमांचक कथा आहे.

Language: हिंदी
Cast:
Producer: Director:
Genre:
लोकमत रेटिंग्स

Sacred Games Review: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान या दोघांची 'सेक्रेड गेम्स' ही एक रोमांचक कथा आहे. या सीरिजच्या माध्यमातून विक्रमादित्य मोटावणे, अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांनी दाखवून दिलं आहे की, बॉलिवूडला काही वेगळं करायचं असेल तर ते कुणालाही टक्कर देऊ शकतात. ही केवळ ८ एपिसोडची नेटफ्लिक्स वेबसीरिज तुम्हाला एका अशा प्रवासावर घेऊन जाते, जो कधी संपूच नये असं वाटायला लागतं. एक एक एपिसोड, एक एक सीन आपल्याला बांधून ठेवण्यास यशस्वी ठरतो. 

विक्रम चंद्रा यांच्या २००६ मध्ये आलेल्या बेस्टसेलर 'सेक्रेड गेम्स' वर आधारित या सीरिजची सुरुवात गणेश गायतोंडे म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या धमाकेदार एन्ट्रीने होते. ही कथा आहे गॅंगस्टर गणेश गायतोंडे आणि पोलीस अधिकारी सरताज सिंह म्हणजेच सैफ अली खान यांची.

गणेश गायतोंडेचा आणि सरताजचा संघर्ष पहिल्या सीन पासूनच सुरु होतो आणि एपिसोडचा शेवट एका सस्पेंसने होतो. सैफ अली खान याला नवाजुद्दीन २५ दिवसांचा वेळ देतो आणि या दिवसात शहराला वाचण्याचं चॅलेन्ज करतो. यातील गणेश गायतोंडेची कथा ही फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आली आहे जे या सीरिजचा सर्वात प्रभावी भाग म्हणता येईल. या सीरिजमधून गॅंगस्टर आणि पोलीस यांच्या जीवनावरही प्रकाश टाकते. इतकेच नाही तर राजकारण, क्राईम आणि धर्मावरही यातून भाष्य केलं आहे. 

सैफ अली खान याने फारच कसलेला अभिनय केलाय, पण नवाजुद्दीनने ज्याप्रकारे गणेश गायतोंडे साकारलाय त्याला तोड नाहीये. असेही म्हणता येईल की, त्याने हे दाखवून दिलं की ही भूमिका त्याच्यापेक्षा चांगली दुसरं कुणी साकारु शकत नाही. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवणे यांनी केलेलं दिग्दर्शन नेहमीप्रमाणे अफलातून झालं आहे. सैफ आणि नवाजसोबत यात राधिका आपटे, राजश्री देशपांडे आणि सुरवीन चावला आणि इतरही सर्व कलाकारांनी अफलातून काम केलं आहे. प्रत्येकाची भूमिका ठळकपणे लक्षात राहणारी आहे.

'सेक्रेड गेम्स' मध्ये ते सगळं आहे जे एका क्राइम थ्रिलरमध्ये असायला हवं. मुंबईतील गुन्हेगारी विश्व हे अनेक सिनेमांमधून मांडलं गेलं आहे. पण यात ते ज्याप्रमाणे रेखाटण्यात आलं ते खरंच कधीही न पाहिल्यासारखं आणि अंगावर येणारं आहे. आता सीरिजचे बाकीचे भाग कधी रिलीज होतील याची आतुरता माझ्यासोबतच ही सीरिज पाहिलेल्या सर्वांनाच लागली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा पुढचा भाग रिलीज होणार होता. मात्र काही अंतर्गत वादामुळे रिलीज डेट पुन्हा टळली.