Join us

Shubh mangal saavdhan review : बोल्ड लग्नाची बोल्ड कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 11:17 AM

‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

Release Date: September 01, 2017Language: हिंदी
Cast: आयुष्यमान खुराणा , भूमी पेडणेकर
Producer: क्रिशिका लुल्ला , आनंद.एल.रायDirector: आनंद एल राय
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
प्राजक्ता चिटणीसभारतीय कुटुंबांमध्ये लग्न हे सगळ्यात जिव्हाळ्या विषय आहे. आपल्या मुलामुलीचे लग्न व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते आणि त्यासाठी ते अनुरूप जोडीदाराच्या शोधात असतात. चांगला दिसणारा, वागणुकीचा, चांगली नोकरी असलेल्या मुलाचा ते शोध घेतात. त्यामुळे एखादे स्थळ आले की, त्याची चौकशीही तितकीच केली जाते. लग्न हा विषय आपल्या खूप जवळचा असला तरी आजही सेक्स या विषयावर आपल्याकडे तितके मोकळेपणाने बोलले जात नाही आणि त्यातही मुलगा नपुसंकत्व असला तरी त्याविषयी चारचौघात बोलणे टाळले जाते. याच विषयावर अतिशय विनोदी अंदाजात शुभ मंगल सावधान या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.आनंद एल राय यांच्या तन्नू वेड्स मनू या चित्रपटाप्रमाणेच एका लग्नाने शुभ मंगल सावधान या चित्रपटाची सुरुवात होते. मुदित (आयुषमान खुराणा) आणि सुगंधा (भूमी पेडणेकर) यांचे लग्न असते. याचवेळी मुदित आणि सुगंधाच्या लग्नाच्या मागची कथा आपल्याला चित्रपटाच्या फ्लॅशबॅकमध्ये पाहायला मिळते. ते दोघे एकाच शहरात राहात असतात. एकमेकांना ते आवडत देखील असतात. पण मुदित आपल्या प्रेमाची कबुली द्यायला घाबरतो आणि सुगंधाला एका ऑनलाइन साइटद्वारे लग्नाचे प्रपोजल पाठवतो. सुंगधाच्या घरातल्यांना देखील सगळ्या गोष्टी योग्य वाटल्याने ते लग्नाला होकार देतात. लग्नाला काही दिवस बाकी असताना सुगंधा आणि मुदित जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळी मुदित नपुंसक असल्याचे त्याच्या लक्षात येते आणि खऱ्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते. हा विषय अतिशय नाजूक असला तरी दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यांनी खूप चांगल्याप्रकारे मांडला आहे. हा चित्रपट पाहाताना आपल्याला कुठेच तो व्हल्गर वाटू नाही याची काळजी घेतली आहे.आपला होणारा नवरा नपुंसक आहे हे कळल्यानंतर खरे तर कोणतीही मुलगी त्या गोष्टीचा बाहू करेल. पण सुगंधा अशा प्रकारे काहीही न करता त्याला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करते. काहीही झाले तरी मी त्याच्याशीच लग्न करणार असा ठाम निर्णय घेते. पण काहीच दिवसांत ही गोष्ट मुदित आणि सुगंधाच्या घरातल्यांना, नातेवाईकांना कळते आणि त्यानंतर तो जणू त्यांच्या घरातील एक जागतिक प्रश्न होऊन बसतो. या सगळ्यातून पुढे काय काय मजा मस्ती घडते हे प्रेक्षकांना शुभ मंगल सावधान या चित्रपटात पाहायला मिळते.शुभ मंगल सावधान या चित्रपटातील आईने मुलीशी सेक्सबद्दल साधलेला संवाद, घरात ब्ल्यू फिल्मची सीडी मिळाल्यानंतर झालेला हाहाकार, लग्नाच्या आदल्या दिवशी मुला-मुलीला एकत्र राहाण्याची घरातल्यांनी दिलेली परवानगी ही दृश्यं प्रेक्षकांना नक्कीच खळखळून हसवतात. सेक्स, नपुसंकत्व या गोष्टीवर विनोदी पण मार्मिक रितीने या चित्रपटाद्वारे भाष्य करण्यात आले आहे. केवळ चित्रपटाचा शेवट खूपच कंटाळवाणा वाटतो. अनेक गोष्टींची अतिशयोक्ती केली असल्यासारखे वाटते.शुभ मंगल सावधान या चित्रपटातील अभिनयासाठी आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर, सीमा पाहावा, ब्रीजेंद्र काला यांना पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजे. एक निखळ मनोरंजन म्हणून हा चित्रपट पाहाण्यास काहीच हरकत नाही.