Join us

Simran Movie Review:फक्त कंगना आणि कंगना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 8:21 AM

कंगना राणौतचा ‘सिमरन’ अखेर आज रिलीज झाला. या चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. प्रेक्षकांच्या या अपेक्षेवर ‘सिमरन’ किती खरा उतरतो, ते बघुयात!

Release Date: September 15, 2017Language: हिंदी
Cast: कंगना राणौत, सोहम शाह
Producer: निर्माता भूषण कुमारDirector: दिग्दर्शक हंसल मेहता
Duration: २ तास ४ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
जान्हवी सामंततीस वर्षांची घटस्फोटित हाऊसकिपींगच्या जॉबमध्ये असलेली मुलगी आईवडिलांचा लग्नासाठीचा दबाव सहन करून घर घेण्याच्या नादात वाईट मार्गाला लागते... खरे तर हा प्लॉट ऐकून ‘सिमरन’ हा अतिशय गंभीर सिनेमा असल्याचे वाटते. पण प्रत्यक्षात  ‘सिमरन’ हा प्रारंभी तरी बराच हलका-फुलका सिनेमा आहे. प्रफुल्ल (कंगना राणौत) या मध्यवर्ती पात्राभोवती फिरणारी ही कथा. तिशीतील घटस्फोटित प्रफुल्लची एक छोटीशी इच्छा असते. ती म्हणजे, स्वत:चे एक घर घेण्याची. या मुलीकडे महत्त्वाकांक्षा असते. पण तिच्या प्रफुल्लचे गुजराती कुटुंबांत तिच्या या महत्त्वाकांक्षेला कुठलेही मोल नसते. घटस्फोट, करिअर आणि बिनधास्त जीवनशैली या सगळ्यामुळे ती केवळ हिणवली जाते. बिनधास्त जगणारी, मुलांसोबत जोरदार फ्लर्ट करणारी प्रफुल्ल  लॉस वेगासमधील एका कॅसिनोत पोहोचते आणि योगायोगाने सगळा पैसा जिंकते. यानंतर प्रफुल्ल ग्लॅम्बलिंगमध्ये अशी काही अडकते की, स्वत:जवळचा घर घेण्यासाठी साठवलेला सगळा पैसा त्यात गमावून बसते. एक प्रायव्हेट लँडर तिला पैसे देतो पण प्रफुल्ल पुन्हा एकदा नशेत सगळा पैसा हरते. मग प्रफुल्लच्या मागे सुरु होतो तो वसूलीचा ससेमिरा. प्रायव्हेट लँडर तिच्याकडे पैशासाठी तगादा लावतो. इतका की, तिच्या जीवावर उठतो. प्रफुल्ल वडिलांकडे मदत मागते. वडिलांकडून मदत मिळवण्याच्या नादात प्रफुल्ल लग्नासाठी एका मुलाला भेटायला तयार होते. अर्थात प्रफुल्लला मनातून लग्न करायचे नसतेच. यातून मग अनेक मजेशीर आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारे प्रसंग चित्रपटात घडतात. याऊपरही पुढे काही कारणास्तव वडिल मदत नाकारतात आणि प्रफुल्लच्या सगळ्याच वाटा बंद होता. कुठलाच मार्ग सापडत नसल्याचे पाहून साधी-भोळी सिमरन एफबीआय व सीआयएने घेरलेल्या अमेरिकेत लूटमार, चोºया सुरु करते. शेवटी प्रफुल्लसोबत काय होते, हे पाहायला अर्थात तुम्हाला चित्रपटगृहांत जायला लागेल.चित्रपटाबद्दल सांगायचे तर मध्यांतरापूर्वीचा ‘सिमरन’ खरोखरीच  खिळवून ठेवतो. प्रुफल्लचा बिनधास्तपणा, तिचे स्वतंत्र विचार, तिचा स्वत:च्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिवाय  एका पारंपरिक गुजराती कुटुंबातील पण स्वत:च्या मर्जीने जगणारी मुलगी सगळेच पाहतांना मज्जा येते. चित्रपटाचा पहिला भाग दिग्दर्शकाने बºयापैकी रंगवलाय. कंगनानेही त्यात जीव ओतलाय. अर्थात मध्यांतरानंतर मात्र दिग्दर्शकाची चित्रपटावरची पकड सुटलेली जाणवते. एक हलकी-फुलकी कथा अचानक गंभीर वळणावर येते. प्रफुल्लच्या समस्या सोप्या नसतात. ही हताशा हळूहळू तिला मध्यमवर्गाच्या संवेदनशीलतेने बाहेर काढत किनाºयावर ढकलून देते. मध्यंतरानंतर चित्रपट बराच संथपणे पुढे सरकतो.  एकंदर सांगायचे तर ‘सिमरन’ म्हणजे केवळ आणि केवळ कंगनाचा शो आहे.  सिमरनसारखे बिनधास्त आणि स्वतंत्र पात्र साकारणाºया कंगनासारख्या फार कमी नट्या बॉलिवूडमध्ये आहेत, हे हा चित्रपट पाहिल्यानंतर मानायलाच हवे. कंगनाने सिमरन ही व्यक्तिरेखा अगदी सहजपणे पडद्यावर चितारली आहे. भूमिकेच्या चौकटीत ती अगदी फिट बसते. पण म्हणून ‘सिमरन’ची ‘क्विन’सोबत तुलना करता येणार नाही. निश्चितपणे ‘सिमरन’ दुसरा ‘क्वीन’ नाही. दोन्ही चित्रपटाची शैली आणि मांडणी बरीचशी समान आहे. ‘क्वीन’ एक साधा सरळ चित्रपट होता. पण ‘सिमरन’ हा अनेक कंगोरे असलेला आणि अधिक जटील चित्रपट आहे.  प्रफुल्लचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तिचे स्वतंत्र विचार यावर प्रकाश टाकताना दिग्दर्शक कचरत नाही. तसाच महिलांचे निर्णय व समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यावरही भाष्य करतानाही तो बिचकत नाही. सांगायचे हे की, कंगनाचे चाहते असाल तर तुम्ही हा चित्रपट पाहायला जावू शकता. अन्यथा एखादा दुसरा चांगला पर्याय शोधू शकता.