Join us

कहानी २ - दुर्गा रानी सिंग : एक थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 5:53 PM

After its successful prequel, it is natural for a lot of expectations and anticipation on the part of viewers for this instalment of Kahaani; हा चित्रपट संपूर्ण मनोरंजक व शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा आहे. ‘कहानी’ या चित्रपटाहून वेगळी स्वतंत्र ओळख असलेला ‘कहानी 2- दुर्गा रानी सिंग’ हा चित्रपट आहे हे सांगणे या चित्रपटासाठी पुरेसे आहे.

Release Date: December 02, 2016Language: हिंदी
Cast: विद्या बालन, अर्जुन रामपाल
Producer: बाऊंडस्क्रिप्ट मोशन पिक्चर्सDirector: सुजॉय घोष
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
जान्हवी सामंतअभिनेत्री विद्या बालन हिचा ‘कहानी’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना त्याच्या रहस्यमय कथेमुळे आठवतो. त्यामुळे 'कहानी 2- दुर्गा रानी सिंग'बद्दल रसिकांमध्ये उत्सुकता असणे साहाजिकच आहे. कहानी एवढा रहस्यमय किंवा प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणारा नसला तरीही 'कहानी 2' हा एक चांगला चित्रपट आहे. ‘कहानी २’ हा चित्रपट एका आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. कोलकाता शहराच्याजवळ चंदननगर या परिसरातमध्ये विद्या सिन्हा (विद्या बालन) आणि तिची मुलगी मिनी (टुनिषा शर्मा) राहत असतात. विद्याच्या अंगावर असलेल्या चुरघळलेल्या साड्या, घरातला पसारा, ऑफीसला जाण्यासाठी ट्रेन पकडायची धावपळ, शहारतली गजबज या वातावरणातून दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी एका सिंगल मदरची जबाबदारी आणि बांधिलकी ही सहजपणे रेखाटली आहे. पण या सगळ्या गदारोळात अचानक एकेदिवशी अपंग मिनी गायब होते आणि इथूनच 'कहानी 2' ची खरी सुरुवात होते. पोलीस इन्स्पेक्टर इंद्रजित सिंग (अर्जुन रामपाल)  या केसची पडताळणी करण्यासाठी कामाला लागतो आणि यानंतर चित्रपटाची कथा हळूहळू उलगडत जाते.       इन्स्पेक्टर इंद्रजित (अर्जुन रामपाल) याने केलेल्या प्राथमिक तपासातून विद्याच्या भूतकाळ व वर्तमानाबद्दलची धक्कादायक तथ्ये समोर येतात. ज्यामधून तिच्या मुलीच्या अपहरणाबद्दल खूप महत्त्वाचे धागेदोरे सापडतात. यापेक्षा अधिक गोष्टींचा उलगडा केल्यास त्यातील सस्पेन्स निघून जाईल. चित्रपटाचे कथानक अंदाज बांधण्याजोगे असले तरीही चित्रपटाची कथा मनोरंजक  आहे. याचे श्रेय चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिलेच पाहिजे. विद्या सिन्हा या चिंताग्रस्त आईच्या भूमिकेत विद्या बालन अगदी खरी उतरली आहे. विसकटलेले केस, सतत दगदग, अस्थाव्यस्थ अवस्थेत विद्या आकर्षक दिसत नसली तरीही मनाला भावते. लहान मिनीच्या भूमिकेला नाईशा खन्नाने न्याय दिला आहे.  23 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जुगलने पहिल्यांदाच अर्थपूर्ण भूमिका केली आहे. कोलकत्ता या शहराला 'कहानी'मध्ये जितक्या आत्मियतेने दाखवले आहे तितक्याच ते या भागातही दाखवले आहे. कोलकत्तामधील जीवनमान आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी ही फार सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री विद्या सिन्हा आणि रजनीगंधा या चित्रपटाला ही घोषने सलाम दिला आहे. कथा इतकी भावूक आणि गतीशीलपणे सादर करण्यात आली आहे की त्यात फारस तथ्य नाही हे बघताना आपल्याला जाणवत नाही. 'कहानी'मध्ये ही असे बरेच प्रश्न अनुउत्तरित राहीले होते. चित्रपट संपल्यानंतर कथेबद्दल मात्र बरेच प्रश्न डोक्यात उभे राहतात. अपहरणकर्ता इतके वर्ष का थांबतो ? मुलीला दुखापत करुन त्याचा काय फायदा होऊ शकतो ? पोलीस यंत्रणा एवढी अजाण कशी असू शकते ? असे बरेच प्रश्न पडतात. कहानी इतका प्रभावी नसला तरीही निश्चितच मनोरंजक आहे 'कहानी 2'.