Join us

Teri Bhabhi Hai Pagle movie review: वेस्ट आॅफ टाईम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 6:37 PM

 विनोद तिवारी दिग्दर्शित तेरी भाभी है पगले हा एक विनोदी चित्रपट आहे. रजनीश दुग्गल, कृष्णा अभिषेक, मुकूल देव यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. 

Release Date: July 13, 2018Language: हिंदी
Cast:  रजनीश दुग्गल, कृष्णा अभिषेक, मुकूल देव
Producer: Director: विनोद तिवारी
Genre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

 विनोद तिवारी दिग्दर्शित तेरी भाभी है पगले हा एक विनोदी चित्रपट आहे. रजनीश दुग्गल, कृष्णा अभिषेक, मुकूल देव यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट. खरे तर या चित्रपटाला टुकार म्हणणेही त्याची प्रशंसा केल्यासारखे होईल. करिअर रसातळाला लागलेला बाईलवेडा राज चोप्रा (क्रिष्णा अभिषेक) फिल्मी दुनियेत पुन्हा परतण्यासाठी नवोदित दिग्दर्शक देवच्या (रजनीश दुग्गल) स्क्रिप्टवर एका चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवतो. देवला आधीच एका टीव्ही मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला असतो. त्यामुळे राज प्रोड्यूस करणार असालेला चित्रपट त्याच्या करिअरसाठीही प्रचंड महत्त्वाचा असतो. आॅडिशनवेळी राजची भेट देवची गर्लफ्रेन्ड रागिणीशी (नाझिया हुसैन) होते. रागिणीला पटवण्याच्या हट्टात देवच्या मनाविरूद्ध राज तिला चित्रपटात हिरोईन म्हणून घेतो. पण पुढे घोडे अडते. काही आवश्यक परवानगीअभावी शूटींग रखडते. यावरचा उपाय म्हणून राज आपला गँगस्टर फायनान्सर हरूभाईला (मुकूल देव) बोलवतो़ पण हरूभाईची नजर रागिणीवर पडते आणि तोही तिच्यामागे पडतो. या सगळ्यांमुळे देवचा चित्रपट आणि रोमान्स दोन्हीवर परिणाम व्हायला लागतो. या सगळ्यांत कॉमेडी नाही तर नुसताच गोंधळ होतो.

 कृष्णा अभिषेक आणि सुनील पाल सारखे मुरलेले कॉमेडियन असूनही या कथेत कुठलाच दम वाटत नाही. खरे सांगायचे तर हा चित्रपट पाहणेचं नाही तर त्याचे समीक्षणही ‘वेस्ट आॅफ टाईम’ आहे. 

टॅग्स :बॉलिवूड