Join us

The Archies Movie Review : कॉमिक जगताची सफर अन् स्टारकिड्सच्या अभिनयाची जादू 'द आर्चीज', वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 6:09 PM

The Archies Movie Review : जाणून घ्या कसा आहे, स्टारकिड्सचा 'द आर्चीज' सिनेमा

Release Date: December 07, 2023Language: हिंदी
Cast: अगस्त्य नंदा, खुशी कपूर, सुहाना खान, वेदांग रैना, मिहिर आहूजा, आदिती सहगल आणि युवराज मेंडा
Producer: झोया अख्तर, रीमा कागती Director: झोया अख्तर
Duration: २ तास २३ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

>>अबोली शेलदरकर

लहानपणी कॉमिक्स वाचले नाहीत, असा व्यक्ती सापडणे कठीण. कॉमिक्ससोबत लहानपणीच्या काही आठवणी जुळलेल्या असतात. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा सिनेमा पाहताना तुम्हाला कॉमिक्सची आठवण होईल. शाहरूख खानची लेक सुहाना, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिकेतील हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. ६०च्या दशकातील जीवन अर्थात स्वातंत्र्योत्तर काळ, राहणीमान, सामाजिक जीवन, ड्रेसिंग या सर्व गोष्टींची अदुभत सफर तुम्हाला हा सिनेमा घडवून आणेल. चला तर मग बघूयात, नेमकी कशी आहे या स्टारकिड्सच्या चित्रपटाची कहाणी.

कथानक :चित्रपटाचा मुख्य अभिनेता आर्ची (अगस्त्य नंदा ) रिव्हरडेल नावाच्या एका थंड हवेच्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत मजेत आयुष्य जगत असतो. त्यात त्याची बालपणीची मैत्रीण बिट्टी (खुशी कपूर) हिचे आर्चीवर प्रेम असते. मात्र, आर्चीचे व्हेरोनिका (सुहाना खान) हिच्याबरोबर प्रेम जुळते. ती लंडनहून शिकून आलेली असते. तसेच ती श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी असते. या तिघांसोबत जगहेड (मिहिर आहुजा), डिल्टन डॉइली (युवराज मेंडा), एथल मग्स (आदिती डॉट) आणि रेजी मेंटल (वेदांग रैना) हे सर्व मित्र असतात. आर्चीला संगीतकार बनायचे असते तर व्हेरोनिकाला मॉडेल बनायचे असते. बिट्टीला आर्चीला डेट करायचे असते तर आर्चीला व्हेरोनिका आवडत असते. दुसरीकडे व्हेरोनिकाचे वडील (अली खान) रिव्हरडेलमध्ये एका प्रसिद्ध ‘ग्रीन पार्क’च्या जागी मॉल बनवू इच्छित असतात. रिव्हरडेल गावात अनेक बदल होत असतात त्यामुळे हे सर्व मुले त्रस्त असतात. आता या सर्वांत व्हेरोनिका तिच्या वडिलांना साथ देते की, तिच्या मित्रांना हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

लेखन व दिग्दर्शन :झोया अख्तर यांनी प्रसिद्ध कॉमिक सीरिज बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली दिसतेय. कथानकाची सुंदर मांडणी, पटकथा, चित्रीकरण, कथा, कलाकार हे सर्वच उत्तम आहे. नव्या कलाकारांसह चित्रपट करणे हे आव्हान झोयाने या चित्रपटाच्या माध्यमातून स्विकारले आहे. नव्या पिढीला हा चित्रपट नक्कीच आवडेल. ‘सुनो’ आणि ‘वा-वा-व्रूम’ ही दोन गाणी पसंतीस उतरत आहेत.

अभिनय :झोया अख्तर ही अशी दिग्दर्शिका आहे जिने दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने नव्या पिढीला संधी देण्याचा निश्चय केलेला दिसताे आहे. यात अनेक कलाकारांनी डेब्यू केला आहे. सर्वच स्टारकिड्सनी त्यांच्या अभिनयाचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. सुहाना आणि खुशी यांच्या अभिनयाची छाप पडली आहे. याशिवाय चित्रपटात विनय पाठक आणि अली खान यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला आहे.

सकारात्मक बाजू : कथानक, नवे कलाकार, ६०च्या दशकातील चित्रीकरणनकारात्मक बाजू : बॅकग्राऊंड म्युजिक, संगीतथोडक्यात : त्याच त्या प्रकारचे चित्रपट बघून कंटाळला असाल, तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच तुमचा मूड फ्रेश करेल.

टॅग्स :सुहाना खानखुशी कपूर