Join us

Veere di Wedding Movie Review : मनोरंजक पण उथळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 4:38 AM

‘वीरे दी वेडिंग’ आज रिलीज झाला. जाणून घेऊ यात, हा चित्रपट कसा आहे ते....

Release Date: June 01, 2018Language: हिंदी
Cast: ​करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर , शिखा तलसानिया, सुमित व्यास
Producer: अनिल कपूर, रिया कपूर, एकता कपूरDirector: शशांक घोष
Duration: २ तास ५ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
-जान्हवी सामंत‘वीरे दी वेडिंग’ आज रिलीज झाला. करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या चौघींच्या या चित्रपटाबद्दल आधीपासूनच उत्सुकता होती. त्यातच करिनाचा आई झाल्यानंतरचा हा पहिला चित्रपट असल्याने त्याबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली होती. तेव्हा जाणून घेऊ यात, हा चित्रपट कसा आहे ते....‘दिल चाहता है’ पहिल्यांदा पाहिला तेव्हा लोकांना त्यांचे कौतुक होते. मैत्री सारख्या साध्या सोप्या पण इतक्या नाजूक विषयावर जीव ओतून इतक्या संवेदनशिलपणे बनवलेला तो कदाचित पहिला चित्रपट होता.  ‘वीरे दी वेडिंग’चा ट्रेलर पाहून हा चित्रपट ‘दिल चाहता है’चा फिमेल व्हर्जन असावा असा अंदाज अनेकांनी बांधला होता. थोडा फार हा अंदाज बरोबरही आहे. बालपणीची जीवश्च कंठश्च मैत्री, या मैत्रीतले रूसवे फुगवे, दुरावे, त्यांच्या जीवनातला संघर्ष असलेला ‘वीरे दी वेडिंग’ बराचसा ‘दिल चाहता है’ सारखा आहे. पण ही मैत्री मुलींमधील असल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष बरेच आगळे -वेगळे आणि गुंता गुंतीचे आहेत. ‘वीरे दी वेडिंग’ची कथा आहे, कालिंदी (करिना), सखी (स्वरा भास्कर), अवनी (सोनम कपूर) आणि मीरा (शिखा तलसानिया) यांची. कालिंदीने नुकतेच भारतात येऊन बॉयफ्रेन्ड रिषभ(सुमित व्यास) याच्यासोबत लग्न करणार, हे जाहिर केले असते. हे ऐकून तिच्या मैत्रिणी म्हणजे, लग्न होऊन एका लहान मुलाची आई असलेली मीरा, नुकतीच नवºयापासून विभक्त झालेली सखी आणि मनापासून लग्नासाठी उत्सूक असलेली अवनी अशा तिघी जणी लग्नाबद्दलची आपआपली मते व्यक्त करायला लागतात. त्यातच आईच्या अकाली मृत्यूमुळे आणि वडिलांच्या नुकत्याच झालेल्या दुसºया लग्नामुळे ‘कमिटमेंट फोबिक’ असलेली कालिंदी होणाºया नवºयाच्या घरचा तामझाम बघून काहीशी नव्हर्स होते. पण लग्नाची तयारी सुरु झालेली असते. लग्नाच्या या धामधुमीत या चार मैत्रिणी एकत्र येतात आणि आपले मन हलके करतात. दिल्लीच्या अगदी उच्चभ्रू वर्गातील कथा आणि अतिशय हाय सोसायटी व मॉडर्न अशी पात्र यामुळे  ‘वीरे दी वेडिंग’ची कथा थोडिशी अविश्वसनीय वाटते.  एकीकडे महागडे कपडे, लक्झरी गाड्या, कोट्यवधी रूपयांचा खर्च असा सगळा झगमगाट आणि दुसरीकडे एका झटक्यात लग्न मोडून लगेच लक्झरी हॉलिडेसाठी थायलंडला निघालेल्या मुली हे सगळे जरा पचायला कठीण जाते. त्यातच  एका पेक्षा एक असा विचित्र नात्यांचा गुंताही जड वाटतो. मीराला मुल झाल्यानंतर आयुष्यात आलेला रटाळपणा नकोसा झालेला असतो, अवनीला लग्न करायचे असून चांगला मुलगा मिळत नसतो, कालिंदीला मुलगा मिळाला असूनही लग्न करायचे नसते तर सखीला लग्नाच्या बंधनातूनचं सुटका हवी असते. या सगळ्या मानसिक पातळीवरच्या संर्घषाला या चौघी मैत्रिणी कशा सामोºया जातात हीच ‘वीरे दी वेडिंग’ची कथा आहे. कथा हलकी फुलकी आहे, गमतीदार आहे. आपल्या समाजामध्ये लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोण, मुलींच्या आयुष्याकडे आणि वागण्याकडे बघण्याची पद्धत आणि याची समाजाकडून होणारी सततची चिकित्सा यावर एक मार्मिक भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्याअर्थाने चित्रपटाचे संवाद अतिशय धारदार आणि चटपटीत आहेत. चौघी अभिनेत्रींनीही आपआपल्या वाट्याला आलेले काम अगदी चोख बजावले आहे. चौघींची पडद्यावरची केमिस्ट्री मस्त जमून आलीयं. या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस प्वॉर्इंट म्हणजे, करिना. तिला विनोदी भूमिकेत पाहताना मजा येते. पण तरिही चित्रपटात भरपूर विनोद आणि मनोरंजन असूनही काहीतरी चुकल्यासारखे वाटते. ती म्हणजे संवेदनशिलतेचा अभाव. दिग्दर्शकाने चित्रपटाची पात्रे अतिशय स्वच्छंदी आणि तेज दाखवण्याच्या नादात त्यांच्यातील संवेदनशिलता दडपल्याचे सतत जाणवते. इतक्या खोल नात्यांचा प्रवास मांडतांना म्हणूनच चित्रपटाला कुठलीही खोली असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे चित्रपट उथळ वाटतो. चित्रपटातील दृश्ये हसवतात जरूर. पण संवेदनशील दृश्ये डोळ्यांत पाणी उभे करत नाही.अर्थात तरिही एकदा पाहावा असा हलका-फुलका चित्रपट हा जरूर आहे.