Join us

फुल ऑन एंटरटेनर! कसा आहे राजकुमार राव-तृप्ती डिमरीचा ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’?

By अबोली कुलकर्णी | Updated: October 11, 2024 17:29 IST

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरीच्या ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’ सिनेमा बघण्याआधी वाचा हा review

Release Date: October 11, 2024Language: हिंदी
Cast: राजकुमार राव, तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत, विजय राज, अर्चना पूरन सिंह, मुकेश तिवारी, राकेश बेदी आणि इतर.
Producer: भूषण कुमार, कृष्णन कुमार व इतर.Director: राज शांडिल्य
Genre:
लोकमत रेटिंग्स

‘स्त्री २’ या हिंदी हॉरर काॅमेडीपटात प्रेक्षकांना हसून-हसून लोटपोट करणारा अभिनेता राजकुमार राव आता पुन्हा एकदा हसवायला सज्ज झालाय. नुकताच त्याचा ‘विकी, विद्या का वो वाला व्हिडीओ’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. तो परफेक्ट कॉमिक टाइमिंगसाठी ओळखला जातो. त्याच्यासोबत ‘ॲनिमल’ फेम नॅशनल क्रश अभिनेत्री तृप्ती डिमरी आहे. विकी आणि विद्याकडून हनिमूनच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ बनवलेली सीडी हरवते आणि तिथून सुरू होतो धम्माल कॉमेडीचा प्रवास...

कथानक :९०च्या दशकात ऋषीकेश येथे वास्तव्यास असलेले बालपणीचे मित्र, विक्की (राजकुमार राव) आणि विद्या (तृप्ती डिमरी) यांची ही कहाणी आहे. त्या दोघांच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध असतात. पुढे त्यांचे लग्न होते. दोघांनी वैष्णोदेवीला जावे, असे घरच्यांना वाटत असते. मात्र, विकी हा विद्याला गोव्याला घेऊन जातो. तिथे हनिमूनच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ ते दोघे बनवतात. तिथून परतल्यानंतर त्यांच्या घरात चोरी होते. या चोरीत ‘ती’ सीडी, टीव्ही, सीडी प्लेयर सगळेच गायब होते. मग तिथून सुरू होतो कॉमेडीचा जबरदस्त सिक्वेन्स... ती सीडी सापडते का? विकी एका खुनाच्या प्रकरणात कशा प्रकारे अडकतो, त्यातून तो बाहेर येतो का? सगळी धम्माल पडद्यावर अनुभवण्यातच खरी मजा आहे.

लेखन व दिग्दर्शन : ‘ड्रीम गर्ल २’, ‘जबरिया जोडी’, ‘लव्ह की ॲरेंज मॅरेज’ अशा कॉमेडी चित्रपटांनंतर दिग्दर्शक राज शांडिल्य हे ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ हा कॉमेडी चित्रपट घेऊन आले आहेत. राज यांच्या दिग्दर्शनाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. त्यांनी ९०च्या दशकांतील चित्रीकरण, वेशभूषा, केशसजावट, भाषा या सर्व बारीकसारीक गोष्टींवर काम केले आहे. चित्रपटाचा पहिला चांगला असून दुसरा भाग काहीसा रटाळवाणा वाटतो. मात्र, लगेच चित्रपटाचा ट्रॅक रूळावर येतो. परफेक्ट कॉमेडी सीन्स, वन लाइनर, पंचेस सर्वच प्रेक्षकांना हसवतात. सचिन-जिगर यांचे संगीत दमदार आहे.

अभिनय :अभिनेता राजकुमार राव याने चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर पेलली आहे. तो प्रेक्षकांना त्याच्या कॉमिक टायमिंगने खिळवून ठेवतो. त्याला तृप्ती डिमरीने चांगली साथ दिली आहे. ती या चित्रपटात ‘ॲनिमल’ चित्रपटापेक्षाही जास्त आत्मविश्वासू वाटते. त्याशिवाय विजय राज, मल्लिका शेरावत, अर्चना पूरन सिंह, मुकेश तिवारी, राकेश बेदी यांनी त्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आहे.

सकारात्मक बाजू : राजकुमार राव-तृप्ती डिमरीची कॉमेडी, कथानक, कलाकारनकारात्मक बाजू : दुसऱ्या भागात संथ व रटाळवाणे काही सीन्स.थाेडक्यात : राजकुमार रावच्या कॉमेडीचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्की चित्रपटगृहात बघा.

टॅग्स :राजकुमार रावतृप्ती डिमरीबॉलिवूड