Join us

Vishwaroopam 2 Movie Review : अ‍ॅक्शनचा ‘ओव्हरडोज’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 2:03 PM

कमल हासन लिखित आणि दिग्दर्शित ‘विश्वरूपम2’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. पण हा चित्रपट अगदीच निराश करतो, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. 

Release Date: August 10, 2018Language: हिंदी
Cast: कमल हासन, राहुल बोस, शेखर कपूर, पूजा कुमार, जयदीप अहलावत, वहिदा रहमान
Producer: कमल हासन, वेणु रविचंद्रन, चंद्रा हासनDirector: कमल हासन
Duration: २ तास २१ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

कमल हासन लिखित आणि दिग्दर्शित ‘विश्वरूपम2’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. पण हा चित्रपट अगदीच निराश करतो, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. वास्तवाशी संबंध असो वा नसो, तार्किक कथा असो वा नसोत पण कमल हासन यांचा चित्रपट म्हटले की, त्याला एक विशिष्ट दर्जा असतो. पटकथेची रचनात्मक तेवढीच सुटसुटीत मांडणी, आदर्शवाद अशा बाजूंवर कमल हासन यांचे चित्रपट नेहमीचं उजवे ठरत आले आहेत. पण ‘विश्वरूपम2’ हा याबाबतीत निराश करतो. या चित्रपटात अ‍ॅक्शनचा इतका ‘ओव्हरडोज’ आहे की, नेमकी कथा काय, हेच कळत नाही.चित्रपटाची कथा सुरू होते, ती चित्रपटाचा प्रीक्वल ‘विश्वरूप’संपतो तिथून. अमेरिकास्थित अतिरेकी उमरच्या कचाट्यातून निसटून रॉ एजंट विशाम अहमद काश्मिरी (कमल हासन) त्याची सहकारी अश्मिता (ऐंड्रिया जेरमिया), पत्नी निरूपमा (पूजा कुमार) आणि कर्नल (शेखर कपूर) हे सगळे ब्रिटनला पोहोचतात. पण इथे पोहोचल्या पोहोचल्या उमरचे लोक इथेही सक्रिय असल्याचे आणि आपल्या जीवांना धोका असल्याचे त्यांना कळते.विशाम हा इतकी वर्षे अमेरिकेत डान्स टीचरच्या वेशात अल-कायदाच्या स्लीपर सेल्सची पाळेमुळे खणत असतो, हे त्याच्या पत्नीलाही ठाऊक नसते. आपला नवरा मुळातचं एक मुस्लिम आहे आणि त्याला आपला प्रियकर बॉस दीपंकरबद्दल सगळे काही ठाऊक आहे, हेही तिला नंतरचं कळते. एकदिवस अचानक प्रियकरामुळे ती धोक्यात येते आणि नवरा अर्थात विशाम तिला वाचवायला पोहोचतो. यावेळी त्याचे ‘माचो रूप’ ती पहिल्यांदाचं बघते. नवऱ्याबद्दलच्या अनेक नव-नव्या गोष्टी तिला कळू लागतात. तो अफगाणिस्तानात कसा पोहोचला, तिथे त्याने काय शौर्य गाजवले, हे तिला कळते आणि आपला नवरा एक खरा देशभक्त आहे, याची तिला खात्री पटते. पण ब्रिटनमधून नवी दिल्लीला पोहोचेपर्यंत त्यांच्यावर इतके प्राणघातक हल्ले होतात की, नव-यावरचे प्रेम व्यक्त करण्याची संधीचं तिला मिळत नाही. इकडे विशामचा पिच्छा पुरवत उमर नवीदिल्लीत येऊन पोहोचतो आणि अख्खी दिल्ली बेचिराख करण्यासाठी ठिकठिकाणी ६४ बॉम्ब पेरतो. साहजिकच दिलेल्या वेळात विशामला ते सगळे बॉम्ब शोधून निकामी करायचे असतात. ढोबळमानाने हीच ‘विश्वरूपम2’ची कथा. पण पडद्यावर ती बघताना डोकं सुन्न होते.

 बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्यांचे कर्णकर्णक आवाज, सततची अ‍ॅक्शन आणि सोबतीला तितकेच कर्कश पार्श्वसंगीत डोकं सुन्न करते. कथेत अनेक निरर्थक वळणे येतात. या वळणांवर कथेतील पात्र कुठूनही कसेही कथेत शिरकाव करताना दिसतात, कुठून कसेही अचानक बाहेर पडतात. अचानक गाणं वाजायला लागत, अचानकचं बंद होत. या सगळ्या गोष्टी वैताग आणतात. विशामचा आपल्या अल्जाइमरपीडित आईसोबतचा (वहिदा रहेमान) एक हृदयस्पर्शी सीन सोडला तर या चित्रपटात बघण्यासारखे काहीही नाही.

टॅग्स :कमल हासन