Join us

योद्धा: लॉजिक फसलेला हाय-व्होल्टेज 'अ‍ॅक्शन'पट! पाहावा की टाळावा? वाचा REVIEW

By ऋचा वझे | Published: March 15, 2024 1:02 PM

Yodha Movie Review: 'शेरशाह' नंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसतोय. देशभक्ती जागवणारा हा सिनेमा आहे मात्र अनेक सीन्समध्ये काही लॉजिकच नसल्याचं जाणवतं.

Release Date: March 15, 2024Language: हिंदी
Cast: सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना, दिशा पाटनी, तनुज विरवानी
Producer: करण जोहरDirector: पुष्कर ओझा, सागर आंब्रे
Duration: 2 तास 18 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला बहुप्रतिक्षित सिनेमा 'योध्दा' (Yodha) रिलीज झाला आहे. 'शेरशाह' नंतर सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) पुन्हा एकदा आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसतोय. 'शेरशाह'च्या यशानंतर 'योद्धा'कडूनही तुम्हाला त्याच तोडीच्या अपेक्षा असतील, तर ते मात्र होताना दिसत नाही. हा सिनेमा देशभक्ती जागवणारा असला तरी अनेक सीन्समध्ये लॉजिकचा अभाव असल्याचं जाणवतं. सिद्धार्थ, राशी खन्ना (Rashi Khanna) आणि दिशा पाटनी (Disha Patani) अशी तगडी स्टार कास्ट असूनही त्यांचा अभिनय मनाला फारसा भिडणारा वाटत नाही. पण दिग्दर्शन ही सिनेमाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचा मध्यांतरापर्यंतचा प्रवास काहीसा संथ गतीने होताना दिसतो. कथा झटपट पुढे सरकत नाही. पण चित्रपटाचा उत्तरार्ध कमालीचा रंजक आणि रोचक आहे. कारण मध्यांतरानंतर या सिनेमात अनेक 'ट्विस्ट अँड टर्न्स' पाहायला मिळतात.

कथानक-

'योद्धा' हे एक युनिट आहे जे तीनही सैन्य दलांचं काम करु शकतं. या युनिटचा प्रमुख आहे अरुण कटियाल (सिद्धार्थ मल्होत्रा). अरुणच्या वडिलांनीच या युनिटची सुरुवात केली असते. अरुणही वडिलांप्रमाणेच योद्धा बनतो. जेव्हा सैन्यात कोणतीही युद्ध परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सैन्य अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशापर्यंत वाट बघायची असते. मात्र 'योद्धा'ची  ही स्टाईल नाही असे म्हणत अरुण स्वत:च काही निर्णय घेतो. पण त्याच्या या सवयीमुळे एक मोठी वाईट घटना घडते आणि सरकार योद्धा हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेते. सरकारचे मन वळवण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर अरुणची पत्नी प्रिया (राशी खन्ना) त्याच्या आयुष्यातील घटनांवर कशा पद्धतीने व्यक्त होते, त्यांच्या नात्याचे पुढे काय होते, हा प्रवासही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

मध्यांतरानंतर चित्रपट पुढे सरकतो. कालांतराने अरूण ज्या विमानात असतो तेच विमान हायजॅक केले जाते. दिशा पाटनी विमानातील एअर हॉस्टेस असते. हायजॅकमध्ये अरूणचाच हात असल्याचा संशय अनेकांना येतो. अरुण कटियाल खरंच प्लेन हायजॅक करतो की वेगळंच काही घडतं, दिशा पाटनीचा हायजॅकमध्ये काही सहभाग असतो की नसतो, हे सारं गूढ सिनेमाच्या शेवटी उलगडते.

दिग्दर्शन- दिग्दर्शन हीच सिनेमाची ताकद म्हणाली लागेल. ज्याप्रकारे सिनेमात विमानातील दृश्य, अॅक्शन सीक्वेन्स, विमान लँडिंगचा सीन चित्रित करण्यात आला आहे ते लाजबाव आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या नवोदित दिग्दर्शकांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. दोघांनी याआधी 'पठाण', 'वॉर' या अॅक्शन फिल्मसाठी सहाय्यक दिग्दर्शनाचं काम केलं आहे.

अभिनय- मुख्य अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नेहमीप्रमाणेच हँडसम लूकमध्ये दिसतोय. त्याने भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र काही ठिकाणी तो नक्कीच कमी पडताना दिसतो. राशी खन्नाला डायलॉग कमी आणि चेहऱ्यावरील हावभावच जास्त दिलेत. दिशा पटानीचा अभिनय सिनेमात सरप्राईजच आहे. 

सकारात्मक बाजू- दिग्दर्शन, अॅक्शन सीन्सनकारात्मक बाजू- मध्यंतराआधीचा भाग अतिशय संथ, दुसऱ्या भागात अनेक घडामोडी पटापट घडत असल्याने घाई झाल्याचा फिल येतो

एकंदर सिनेमा एकदा पाहण्यासारखा आहे. काही दृश्य नक्कीच अंगावर काटा आणणारे आहेत. काही सीन्समध्ये प्रेक्षकांच्या टाळ्याही येतील. अनेक 'ट्विस्ट अँड टर्न्स'मुळे हा सिनेमा एकदा नक्कीच पाहायला हवा.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रादिशा पाटनीकरण जोहरसिनेमाबॉलिवूड