Join us

Rhea Chakraborty : “क्या लगा मैं वापस नहीं आऊंगी....? ” सुशांत प्रकरणानंतर ३ वर्षांनी रिया चक्रवर्तीचं कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 13:26 IST

Rhea Chakraborty : सुशांत प्रकरणानंतर रियाचं करिअर संपलं असा दावा अनेकांनी केला होता. पण आता रिया कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर फारशी कोणाला माहीत नसलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) अचानक चर्चेत आली. असा एकही दिवस नव्हता जेव्हा रियाची चर्चा झाली नाही. सुशांतचं नाव निघताच रियाचीही चर्चा व्हायची. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सुशांतच्या नंतर सगळं काही बदललं. इतकं की, ड्रग्ज प्रकरणात रिया महिनाभर तुरूंगात गेली. सोशल मीडियावर ती कधी नव्हे इतकी ट्रोल झाली. यानंतर अनेक महिने रियानं स्वत:ला घरात कैद करुन घेतलं होतं. सोशल मीडियापासूनही ती लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया नव्याने सुरुवात केली. सोशल मीडियावरही ती अ‍ॅक्टिव्ह झाली. आता रिया पुन्हा चर्चेत आली आहे. होय, सुमारे ३ वर्षानंतर तिचं कमबॅक होतंय.

सुशांत प्रकरणानंतर रियाचं करिअर संपलं असा दावा अनेकांनी केला होता. पण आता रिया कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. लोकप्रिय रिॲलिटी शो एमटीव्ही रोडिज् १९ (MTVRoadies19) मध्ये ती झळकणार आहे. प्रिन्स नरूला व गौतम गुलाटीनंतर एमटीव्ही एमटीव्ही रोडीजच्या तिसर्या गँग लीडरचा खुलासा झाला आहे. या शोमध्ये रिया चक्रवर्तीत तिसरी गँग लीडर असणार आहे. रियाने याचा प्रोमो शेअर केला आहे. आपको क्या लगा मैं वापस नहीं आऊंगी. डर जाऊंगी. डरने की बारी किसी और की है. मिलते हैं ऑडिशंस पर...., असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.

रियाचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. काही सुशांतच्या चाहत्यांनी मात्र तिला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अनेकांनी रियाला घेतल्यामुळे रोडिजच्या मेकर्सला देखील ट्रोल केलं आहे. रोडिजचा हा सीझन कॉन्ट्रोवर्सिअल करण्यासाठी रियाला घेतलं का, असा सवाल अनेक युजर्सनी केला आहे. हे सीझन सुपरफ्लॉप होणार, तुम्हाला दुसरं कोणी सापडलं नाही का, सगळा मूड गेला, अशा कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.   

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतएमटीव्ही