बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीला आरोपी ठरवत एनसीबीने अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणातही तिचे नाव समोर आले. या सगळ्या प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती तुफान चर्चेत होती. यापूर्वी रिया चक्रवर्ती कोणाला फारशी माहिती नव्हती. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती वादात सापडली. बघावे तिथे रिया चक्रवर्तीविषयी चर्चा रंगायच्या. सतत वादात राहणारी रियाचे आयुष्य अजुनही सुरळीत झालेले नाही. रिया तिच्या कुटुंबासह ज्या फ्लॅटमध्ये राहत होती ते घर सोडण्याची वेळ रिया आणि तिच्या कुटुंबियांवर आली आहे.
सोसायटीने रियाच्या कुटुंबियांना फ्लॅट खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे सध्या रियाचे कुटुंबिय नवीन घराच्या शोधात आहेत. मात्र रियाला आता घर मिळण्यातही अडचणी येत असल्यामुळे कुणी घर देता का घर?, असे म्हणण्याचीच वेळ रियावर आली आहे. हतबल होऊन मुंबईत घर शोधण्यात तिचे आई - वडिल व्यस्त आहेत.
सध्या रिया तिच्या कुटुंबासह सांताक्रूझ येथे राहते. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर तिच्या फ्लॅटबाहेर दररोज प्रसार माध्यमांची गर्दी असायची. त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
आता तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे रिया सतत मीडियाचे कॅमेरे आजही तिच्या घराबाहेर असतात. त्यामुळे तिचे जगणेच मुश्किल करुन टाकले आहे. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी राहेत घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात कुटुंबिय असल्याचेही सांगितले जात आहे.
SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार
रियाच्या शेजारी असलेल्या डिंपलने असा दावा केला होता की, 13 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत रियाला सोडण्यासाठी तिच्या इमारतीत आला होता. 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत मुंबईच्या वांद्रे येथे एका घरात मृतावस्थेत आढळला. सीबीआय चौकशीत डिंपल हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत असा अनेक माध्यमांच्या वृत्तांत दावा केला गेला होता.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांना मुंबई उच्च न्यायालयाने 7 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर हायकोर्टाने म्हटले आहे की, "रिया ड्रग्ज विक्रेत्यांचा भाग नाही." तिने विकत घेतलेले ड्रग्ज पैशासाठी किंवा इतर कोणत्याही लाभासाठी दुसऱ्याला दिले नाही."