मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करण्यात येत असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी कारवाई करत आहे. शोविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. तसेच रिया आणि शोविकच्या अडचणीत वाढ होत आहे. याच दरम्यान रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रियाने सुशांतची बहीण प्रियंका सिंह, मीतू सिंह आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच सुशांतच्या बहिणींवर रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. रियाने तक्रार दाखल केल्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.
सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार केली दाखल
सोमवारी रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे. सुशांतचा आजार माहीत असून देखील त्याबाबत सुशांतच्या घरच्यांनी माहिती लपवली. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय त्याला औषधे दिली असं रियाने म्हटलं आहे. रियाने आरएमएलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनबाबत तक्रार देखील दाखल केली आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी ही माहिती दिली. रियाने बनावट, एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू
एनसीबी या प्रकरणात रिया चक्रवर्ती याची चौकशी करीत आहे. या प्रकरणात एनसीबीने सुशांतचा स्टाफ दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरंडा यांना रियाचा भाऊ शोविक यांना अटक केली आहे. रियाचे प्रकरण कसे हाताळायचे याबद्दल एनसीबीने बैठक घेतल्याचे सांगण्यात आले आहे. बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की आता रियाच्या संपर्कात असलेल्या सर्व ड्रग पेडलर्सची यादी तयार केली जाईल. एनसीबी रियाच्या मित्रांबद्दल माहिती गोळा करेल.
"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शोविकच्या अडचणीत वाढ होत असतानाच त्यांचे वडील रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अभिनंदन इंडिया...तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली" असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे त्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने एक संदेश जोरदार व्हायरल झाला असून त्यात त्यांनी शोविकच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिल्याचं म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; 'या' आकडेवारीने दिला मोठा दिलासा
अलर्ट! गुगल प्ले स्टोरवरून हटवले 'हे' 6 धोकादायक अॅप्स, त्वरीत करा डिलीट अन्यथा...
दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक
"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"
चांद्रयान-3 मोहिमेत होणार मोठा बदल, जाणून घ्या कधी होणार लाँच?