Join us

अनूप जलोटा व जसलीनसोबत तुलना झाल्याने बिथरली रिया चक्रवर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 13:14 IST

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचा एक फोटो अलीकडे चांगलाच चर्चेत आला. या फोटोवरून रिया आणि महेश यांची चांगलीच खिल्ली उडवली गेली. 

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचा एक फोटो अलीकडे चांगलाच चर्चेत आला. या फोटोवरून रिया आणि महेश यांची चांगलीच खिल्ली उडवली गेली.  त्यांच्या या फोटोची तुलना अनूप जलोटा आणि जसलीन मथारूसोबत करून ट्रोलर्सनी त्यांना लक्ष्य केले होते. खरे तर सोशल मीडियावर ट्रोल होणे, सेलिब्रिटींसाठी नवे नाही़ आता तर सेलिब्रिटींनाही ज्यांचा चेहराचं नाही, अशा लोकांच्या अर्थात अशा ट्रोलर्सच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही, हे कळले आहे. मात्र रिया चक्रवर्ती ट्रोल झाल्यावर शांत बसू शकली नाही. महेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करून ट्रोल झालेल्या रियाने ट्रोलर्सला अगदी सडेतोड उत्तर दिले. तिने महेश यांच्यासोबतचा आणखी एक फोटो शेअर केलाच. शिवाय ट्रोलर्सला उद्देशून इतकेच नाही तर तू कोण आहेस? असा डिवचणारा प्रश्नही विचारला. 

‘तू कौन है, तेरा नाम क्या? सीता भी यहां बदनाम हुई..ट्रोल करने वालों क्या तुम लोगों को नहीं पता की, तुम जैसे हो, तुम दुनिया को भी वैसे ही देखत हो...,’ असे तिने लिहिले. रिया चक्रवर्ती भट्ट कॅम्पचा आगामी चित्रपट ‘जलेबी’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. 

महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या विशेष फिल्म्स द्वारा निर्मित हा चित्रपट पुष्पदीप भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात रेहा चक्रवर्ती, दिवांगना सूर्यवंशी आणि वरूण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत.  रियाने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’, ‘बँक चोर’ अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे.  

टॅग्स :रिया चक्रवर्तीमहेश भटजलेबी