Join us

अली फजल आणि रिचा चड्डा कधी करणार लग्न, अखेर रिचानेच केला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:03 IST

अली आणि रिचा गेल्यावर्षी लग्न करणार होते. पण कोरोनोमुळे त्यांना त्याचे लग्न पुढे ढकलावे लागले.

ठळक मुद्देसध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकांना लग्नाला येणे शक्य नाहीये. आमचे अनेक फ्रेंड्स विदेशातून देखील लग्नाला येणार आहेत. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्याशिवाय सुरक्षित वाटणारच नाही.

फुकरे आणि फुकरे रिटर्न्समध्ये अली फजल आणि रिचा चड्डा मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटातील त्यांचे काम प्रेक्षकांना खूप भावले होते. हे दोघे खऱ्या आयुष्यात रिलेशनशीपमध्ये असून त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येते. तसेच ते दोघे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. 74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान अली फजल आणि रिचा चड्डा या दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. दोघांनी एकत्र रेड कार्पेटवर उतरत लोकांना सरप्राईज दिले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसतात. ते दोघे जवळजवळ पाच वर्षांपासून एकमेकांसोबत नात्यात आहेत.

अली आणि रिचा गेल्यावर्षी लग्न करणार होते. पण कोरोनोमुळे त्यांना त्याचे लग्न पुढे ढकलावे लागले. ते दोघे आता कधी लग्न करणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. ते दोघे कधी लग्न करणार याविषयी रिचानेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. रिचाने नवभारतटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, कोरोनाची परिस्थिती पाहाता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच आम्ही ठरवले की, आम्ही लग्न पुढे ढकलूया... सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकांना लग्नाला येणे शक्य नाहीये. आमचे अनेक फ्रेंड्स विदेशातून देखील लग्नाला येणार आहेत. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाची लस आल्याशिवाय सुरक्षित वाटणारच नाही. त्यामुळे लस आल्यावर, लस लोकांना मिळाल्यावर आम्ही लग्नाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत तरी आमचा लग्नाचा काहीही विचार नाहीये.

अली आणि रिचा यांनी लग्नाची तयारी देखील केली होती असे म्हटले जाते. पण कोरोनोमुळे त्यांच्या लग्नाला प्लान रद्द झाला. अली आणि रिचा लवकरच लग्न करतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना लागलेली आहे.

टॅग्स :रिचा चड्डाअली फजल