Join us

कपूर घराण्याच्या ‘या’ लेकीला नाही अ‍ॅक्टिंगमध्ये रस, आज आहे कोट्यवधीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:33 IST

करिश्मा कपूर व करिना कपूर या कपूर घराणाच्या दोन लेकींनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. पण याच कुटुंबाची आणखी एक लेक मात्र बॉलिवूडपासून दूर आहे.

ठळक मुद्दे 2006 मध्ये रिद्धीमाने दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेसमन भरत साहनीशी लग्न केले.

करिश्मा कपूर व करिना कपूर या कपूर घराणाच्या दोन लेकींनी बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. पण याच कुटुंबाची आणखी एक लेक मात्र बॉलिवूडपासून दूर आहे. सौंदर्य, टॅलेंट असे सगळे काही असूनही ती बॉलिवूडपासून दूर राहिली. तिचे नाव काय तर रिद्धीमा कपूर. होय, ऋषी कपूर व नीतू सिंग यांची लेक व रणबीर कपूरची बहीण रिद्धीमा  साहनी. आज रिद्धीमाचा वाढदिवस . 

रिद्धीमा  रणबीरपेक्षा मोठी आहे. पण करिना व ती दोघीही एकाच वयाच्या आहेत. दोघींमध्ये केवळ 6 दिवसांचे अंतर आहे. दोघींच्या जन्मावेळी राज कपूर प्रचंड आनंदी होते. ‘माझ्या घरी रिद्धि-सिद्धी जन्मल्यात,’ असे ते म्हणाले होते. याचमुळे ऋषी व नीतू यांनी आपल्या लेकीचे नाव रिद्धीमा ठेवले.

पुढे अनेक वर्षांनंतर करिनाने बॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तर रिद्धीमा ने शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले.  करिना बॉलिवूड डेब्यूमध्ये बीझी होती, त्यावेळी रिद्धीमा  मात्र लंडनमध्ये  शिकत होती.

लहानपणापासूनच रिद्धीमाला अ‍ॅक्टिंगमध्ये अजिबात रस नव्हता. याऊलट सिंगींग, फॅशन डिझाईनिंगमध्ये तिला करिअर करायचे होते. आज रिद्धीमा  फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ती फॅशन डिझाईनिंगशिवाय ज्वेलरी डिझाइन सुद्धा करते. बॉलिवूडपासून दूर राहूनही ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. तिचा ‘आर’ नावाचा एक मोठा ज्वेलरी ब्रँड आहे. हा ब्रँड लोकांमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. गतवर्षी तिच्या या ब्रँडवर डिझाईन चोरीचा आरोप लागला होता. यानंतर रिद्धीमाला माफी मागावी लागली होती.

बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यामध्येही रिद्धीमा दिसते. आपल्या आईसोबत ज्वेलरी मॅग्झीनच्या कव्हर पेजवरही ती दिसली आहे. 2006 मध्ये रिद्धीमाने दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेसमन भरत साहनीशी लग्न केले. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. या दोघांची ओळख लंडनध्ये झाली होती. त्यानंतर 2006 मध्ये हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले.

 

टॅग्स :रिद्धिमा कपूरऋषी कपूरनितू सिंगरणबीर कपूर