Join us  

रिंकू राजगुरू ठरतेय मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यात महागडी अभिनेत्री, मेकअपसाठी तब्बल घेतले इतके लाख?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 3:07 PM

रिंकूचा मेकअप हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी रिंकूला किती मानधन मिळाले हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

ठळक मुद्देसई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांसारख्या अभिनेत्रींना चित्रपटात काम करण्यासाठी १५ लाख इतके मानधन मिळते. त्यांच्या तुलनेत रिंकू राजगुरू ही खूप नवीन असली तरी तिला मेकअप या चित्रपटासाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. 

सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी या आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींना चित्रपटात काम करायला तगडे मानधन मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, या सगळ्या अभिनेत्रींना मागे टाकत अभिनेत्री रिंकू राजगुरू सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. 

सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. सैराट या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी तिचा कागर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटाला सैराट इतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

आता रिंकूचा मेकअप हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी रिंकूला किती मानधन मिळाले हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांसारख्या अभिनेत्रींना चित्रपटात काम करण्यासाठी १५ लाख इतके मानधन मिळते. त्यांच्या तुलनेत रिंकू राजगुरू ही खूप नवीन असली तरी तिला मेकअप या चित्रपटासाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. 

रिंकू राजगुरूच्या मेकअप या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे. हा टीजर पाहून ग्रामीण भागातील मुलगी शहरात आल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडते हे पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे. या टीजरमध्ये रिंकूचा गाम्रीण लहेजामधील संवाद ऐकायला मिळत असून हा चित्रपट खूपच रंजक वाटत आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसई ताम्हणकरसोनाली कुलकर्णीअमृता खानविलकर