Exclusive : तुम्हाला माहिती आहे का, रिंकूला राजगुरुला 'या' व्यक्तिच्या बायोपिकमध्ये करायचं काम
By गीतांजली | Published: April 20, 2019 05:37 PM2019-04-20T17:37:38+5:302019-04-20T17:44:29+5:30
सैराटनंतर रिंकू राजगुरु हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. रिंकूला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आता रिंकू लवकरच प्रेक्षकांना कागर सिनेमात दिसणार आहे.
सैराटनंतर रिंकू राजगुरु हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. रिंकूला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. आता रिंकू लवकरच प्रेक्षकांना कागर सिनेमात दिसणार आहे. सैराटनंतर तब्बल तीन वर्षांनी रिंकू कागरच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कागरच्या निमित्ताने संवाद साधताना रिंकूला कोणच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडले असा प्रश्न विचारण्यात आला यावर रिंकूने तिला सावित्री बाई फुले यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायला आवडले असे उत्तर दिले. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे मला त्यांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडले असे रिंकू म्हणाली.
सैराटनं रिंकू एका चांगल्या कथेच्या शोधात होती त्यामुळे तिने तब्बल तीन वर्षांच्या कालावधी कमबॅक करण्यासाठी घेतले. 'कागर'मध्ये ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे.
तर शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. एककीडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा “कागर” २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.