Join us

रिंकू राजगुरूच्या कागरचा टीझर रिलीज, पहा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 6:05 PM

'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच 'कागर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर लवकरच 'कागर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. अल्पावधीत या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे. 

'कागर' चित्रपटाच्या टीझरमध्ये पुन्हा एकदा रिंकूचा सैराटमधील आर्चीचा बोलण्याचा बाज पाहायला मिळतो आहे. या टीझर पाहिल्यानंतर यातही प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. मात्र राजकारणाला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा गुंफण्यात आल्याचे जाणवते. तसेच तिच्या प्रियकराला मारहाण होते आणि रिंकू राजकारणात एन्ट्री करते, असे दाखवण्यात आले आहे. तिची प्रेमकथा पूर्ण होते की अपूर्ण राहते, हे चित्रपटातच समजेल. 

'कागर'चा टीझर पाहिल्यानंतर रिंकूला एका वेगळ्या अंदाजात पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदने या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्याच अकलूजमध्ये करण्यात आले आहे. कागर चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूकागर