Join us

Rishabh Pant Urvashi Rautela: रिषभ पंतने त्या मुलीसाठी उर्वशी रौतेलाचा नंबर BLOCK केला होता? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:40 PM

रिषभ पंत उर्वशी रौतेला हिला डेट करत असल्याचीही होती चर्चा

Rishabh Pant Urvashi Rautela: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिषभ पंत यांच्यातील वाद सध्या चांगलाच गाजतोय. उर्वशी रौतेला हिने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिने असे सांगितले की, मिस्टर आरपी मला भेटण्यासाठी बराच वेळ थांबला होता. तिने मिस्टर आरपी कोण हे सांगितलं नाही. पण त्यानंतर थोड्याच वेळात रिषभ पंतने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यामुळे तो आरपी रिषभ पंत असल्याची नेटकऱ्यांना खात्रीच पटली.

उर्वशी मुलाखतीत म्हणाली होती की, एकदा आरपी नावाच्या व्यक्तीने हॉटेलच्या लॉबीमध्ये १० तास तिची वाट पाहिली होती. मात्र तिला वेळ नसल्यामुळे ती त्या व्यक्तीला भेटू शकली नाही. उर्वशीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटर रिषभ पंतने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. रिषभने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता म्हटले होते, 'माझा पाठलाग करणं सोड.' इतकंच नव्हे तर त्याने तिला चक्क बहिण असं संबोधलं होतं. यावर उर्वशी रौतेलाने एका पोस्टद्वारे रिषभला जशास तसं उत्तर दिलं. उर्वशीने लिहिलं की, 'छोटू भैयाने बॅट बॉल खेळावं. मी मुन्नी नाहीये, जी तुझ्यासाठी बदनाम होईल. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.' या साऱ्या ऑनलाईन गोंधळात नेटकऱ्यांना पंतने उर्वशीचा नंबर ब्लॉक केल्याच्या कहाणीची आठवण झाली.

२०१९ मध्ये रिषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा एकत्र दिसले होते. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र उर्वशीने रिषभ सोबतच्या नात्याला मैत्रीचं नाव दिलं. त्याच वेळी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतने उर्वशीला एका मुलीसाठी ब्लॉक केल्याचं बोललं जात होतं. ती मुलगी म्हणजे पंतची गर्लफ्रेंड इशा नेगी अशी आता चर्चा आहे. रिषभने अचानक २०१९ मध्ये इशा नेगीसोबत फोटो पोस्ट केला होता. त्यात त्याने लिहिले होते की 'मला फक्त तुला आनंदी ठेवायचे आहे, कारण तुझ्यामुळे मी खूप आनंदी आहे.' त्यामुळे या साऱ्या गोष्टींचा संबंध आता त्या नंबर ब्लॉक प्रकरणाशी लावला जात असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतसोशल मीडिया