Join us

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 2:31 PM

ऋषी कपूर हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले याबद्दल कपूर कुटुंबियांनी मौन राखणेच पसंत केले होते.

ठळक मुद्देनिर्माते राहुल रावैल यांनी सोशल मीडियाद्वारे ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाले असल्याचे त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे. राहुल यांनी फेसबुकवर नुकताच ऋषी कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत ऋषी कपूर (चिंटू) कर्कमुक्त झाले असल्याचे म्हटले आहे. 

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर गेल्या सात महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. पण आता निर्माते राहुल रावैल यांनी सोशल मीडियाद्वारे ऋषी कपूर कर्करोगमुक्त झाले असल्याचे त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे. राहुल यांनी फेसबुकवर नुकताच ऋषी कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत ऋषी कपूर (चिंटू) कर्कमुक्त झाले असल्याचे म्हटले आहे. 

ऋषी कपूर हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले याबद्दल कपूर कुटुंबियांनी मौन राखणेच पसंत केले होते. पण आता राहुल रावैल यांच्या फेसबुक पोस्टवरून ऋषी कपूर कर्करोगाच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले होते हे कळून येत आहे. आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. त्यांची पत्नी नीतू सिंग गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्यासोबतच आहे. 

ऋषी कपूर यांनी अमेरिकेत जाण्यापूर्वी ट्विटरद्वारे त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी ट्विटरवरून सांगितले होते. पण त्यांना कुठला आजार झालाय, हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण या बातम्या चुकीच्या असल्याचे कपूर कुटुंबियांनी म्हटले होते. 

पण नीतू कपूर सिंग यांनी नववर्षाला इन्स्टाग्रामवरून शुभेच्छा दिताना कॅन्सरविषयी लिहिल्याने ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. रणबीर कपूर, आलिया भट्ट, ऋषी कपूर, नीतू सिंग, रिद्धिमा कपूर यांचा न्यू ईयर सेलिब्रेशनचा फोटो नीतू सिंग यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी लिहिले होते की, ‘नवीन वर्षांचा काहीच संकल्प नाही. केवळ प्रदूषण कमी होऊ देत. आशा आहे की, भविष्यात ‘कॅन्सर’ हे फक्त एका राशीचेचं नाव असेल. गरिबी कमी होऊ आणि भरपूर प्रेम आणि सुदृढ आरोग्य लाभू दे...’

टॅग्स :ऋषी कपूरनितू सिंगरणबीर कपूर