बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी मृत्यूपूर्वी एका चित्रपटात काम करणार होते, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत होती. यात ते मुलगा रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करायचा विचार करत होते. ऋषी कपूर आणि रणबीर कपूरचा हा चित्रपट एक सुपरहिट गुजराती चित्रपट चल जीवी लाइएचा रिमेक बनणार होता. गुजराती चित्रपट चाल जीवी लैये जेव्हा ऋषी कपूर यांंनी पाहिला तेव्हा त्यांना तो खूप आवडला. त्यांना हा चित्रपट इतका आवडला की ते या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायला तयार झाले. ऋषी कपूर यांची इच्छा होती की, हा चित्रपट हिंदीत बनला पाहिजे. ज्यात ते स्वतः आणि मुलगा रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारतील. त्यांनी या चित्रपटासाठी रणबीरला देखील तयार केले होते.
चित्रपटाची प्रोडक्शन कंपनीचे सीईओ रितेश लालन यांच्यानुसार, लॉकडाउनच्या आधीपर्यंत ऋषी कपूर यांच्यासोबत बातचीत सुरू होती. यादरम्यान लॉकडाउन सुरू झाले आणि बातचीत थांबली. त्यानंतर ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. रणबीर कपूरसोबत याबद्दल काहीच बोलणे झाले नाही. मात्र नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की रणबीर आणि ऋषी कपूर कोणत्याच चित्रपटात एकत्र काम करणार नव्हते.
त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले की, अभिनव कश्यपच्या बेशरम चित्रपटात काम केल्यानंतर ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांनी एकत्र निर्णय घेतला होता की दोघे कधीच एकत्र काम करणार नाही. ऋषी कपूर यांचे म्हणणे होते की, रणबीर कपूरची लोक उगाच त्यांच्याशी तुलना करतात. जर दोघांनी चित्रपटात काम केले तर ही तुलना आणखीन झाली असती. अशात एकमेकांपासून दूर राहण्यातच समजूतदारपणा आहे.