Join us

या कॅन्सरशी झुंज देत होते ऋषी कपूर, निधनानंतर पहिल्यांदाच झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:31 PM

ऋषी कपूर यांना कॅन्सर होता. गेल्या दोन वर्षांपासून ते या आजाराशी झुंज देत होते. पण हा कॅन्सर कोणता होता, याचा खुलासा अखेरपर्यंत झाला नव्हता.

ठळक मुद्देल्युकेमिया एक ब्लड कॅन्सर आहे, ज्याला क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्यूकेमिया म्हटले जाते. 

अभिनेते ऋषी कपूर यांनी मुंबईतल्या एचएन रिलायन्स रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.  ऋषी कपूर यांना कॅन्सर होता. गेल्या दोन वर्षांपासून ते या आजाराशी झुंज देत होते. पण हा कॅन्सर कोणता होता, याचा खुलासा अखेरपर्यंत झाला नव्हता. पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्याचा खुलासा झाला आहे.

कॅन्सरचे निदान झाल्यावर ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. पण सुरुवातीला त्यांना कॅन्सर झाल्याचे त्यांच्यासह कुटुंबानीही लपवून ठेवले होते.  गंभीर आजाराने ग्रस्त एवढेच काय ते त्यांच्याबद्दल सांगितले गेले होते़. पुढे ऋषी कपूर अमेरिकेत 11 महिने उपचार घेऊन मुंबईत परतले. त्यानंतर कुठे आपल्याला कॅन्सर असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. पण तरीही त्यांना कोणता कॅन्सर आहे, याचा खुलासा  झाला नव्हता. मात्र आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबानं त्यांना कोणता कॅन्सर झाला होता, त्याचा खुलासा केला आहे.

ऋषी कपूर यांना ल्युकेमिया झाला होता.  होय, ऋषी कपूर यांच्या  निधनाचे वृत्त शेअर करताना कपूर कुटुंबाने या कॅन्सरचा खुलासा केला. ऋषी कपूर गेल्या 2 वर्षांपासून ल्युकेमियाशी लढत होते. त्यांचा हा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

काय आहे ल्युकेमिया?ल्युकेमिया एक ब्लड कॅन्सर आहे, ज्याला क्रोनिक लिम्फोसाइटिक ल्यूकेमिया म्हटले जाते.  हा कॅन्सर प्रामुख्याने रक्त आणि बोनमॅरोला प्रभावित करतो. यामध्ये शरीरातील पांढ-या रक्तपेशींचे प्रमाण असामान्य रूपाने वाढते़ त्यानंतर त्यांचा आकारही बदलतो. ल्युकेमियामुळे निरोगी नसलेल्या पेशी वाढतात आणि रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. यामुळे रुग्ण इन्फेक्शन आणि तापाच्या विळख्यात लवकर सापडतो. रुग्णाची त्वचाही पिवळसर पडू लागते. सुरुवातीच्या टप्प्यात यावर उपचार होत नाहीत. कॅन्सर वाढू लागतो तशी लक्षणं दिसू लागतात तेव्हाच त्याच्यावर उपचार सुरू होतात. केमोथेरेपीनंतर सामान्यपणे हा आजार बरा होत नाही.  हा एक असा आजार आहे, जो पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता असते. त्यामुळे बोनमॅरो ट्रान्सप्लांट करून रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. 

टॅग्स :ऋषी कपूर