‘मेरा नाम जोकर’ म्हणत बालवयातच सिनेसृष्टीला ऋषी कपूर यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून दिली. कधी चॉकलेट हीरो तर कधी खलनायक अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. काळानुरूप अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
कपूर खानदानाचे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात किती मोठे योगदान आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ऋषी कपूर यांनी जवळपास 123 चित्रपटात काम केले होते.
आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर त्यांचे वार्षिक उत्पन्न २० कोटी जे जवळपास ३.७ मिलियन डॉलर इतके आहे. त्यांच्या कमाईशिवाय ऋषी कपूर यांच्याजवळ अनेक लक्झरी कार आहेत ज्याची किंमत जवळ जवळ ९.७ मिलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा विचार केला तर २०२० मध्ये निधनाच्या वेळी ऋषी कपूर यांची एकूण संपत्ती ४० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 300 कोटी इतकी होती.
अग्निपथमध्ये साकारलेल्या खालनायकाच्या भूमिकेने त्यांनी सगळ्यांना हैराण केेले. इमरान हाश्मीसोबत द बॉडी सिनेमामध्ये ते शेवटचे दिसले . हा सिनेमा १३ डिसेंबर २०१९ला रिलीज झाला होता.