Join us

नर्गिस यांनी मनविल्यानंतर ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर केली होती एन्ट्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 12:08 IST

अभिनेता ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर खानदानातील लोकप्रिय अभिनेता ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ऋषी कपूर यांनी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ सिनेइंडस्ट्रीचा हिस्सा राहिले आहेत. त्यांनी बॉबी या चित्रपटातून त्यांच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे

ऋषी कपूर यांचा बॉबी हा पहिला चित्रपट नाही तर त्यांनी त्यांचे वडील राज कपूर यांच्या श्री 420 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याबद्दल ऋषी कपूर यांनीच खुलासा केला होता. त्यांना या सिनेमात काम करण्यासाठी नरगीस यांनी मनविले होते. ऋषी कपूर श्री 420 चित्रपटातील गाणे प्यार हुआ इकरार हुआमध्ये दिसले होते. या गाण्यात राज व नरगीस यांच्या मागे पावसात चालणाऱ्या तीन मुलांपैकी एक ऋषी कपूर होते.

 

त्यावेळी ऋषी कपूर तीन वर्षांचे होते आणि नरगीस यांनी त्यांना चॉकलेटचे लालूच दाखवून या गाण्यात घेतले होते. याबद्दल ऋषी कपूर यांनी सांगितले होते की, मला बोलवले होते श्री 420 चित्रपटातील एक शॉट देण्यासाठी आणि त्यात मी माझा मोठा भाऊ व बहिणदेखील असणार होते. जेव्हा ते चित्रीत करत होते तेव्हा आम्हाला पावसात चालायचे होते. त्यावेळी शूट दरम्यान माझ्यावर पाणी पडल्यावर मी रडायला लागायचो. त्यामुळे तो सीन शूट होत नव्हता. त्यावेळी नरगीस यांनी सांगितले की, जर तू शॉटदरम्यान डोळे खुले ठेवशील आणि रडला नाहीस तर मी तुला चॉकलेट देईन. त्यानंतर मी चॉकलेटसाठी डोळे खुले ठेवले आणि माझी ती पहिली शूटिंग होती.

त्यानंतर ऋषी कपूर यांनी मेरा नाम जोकर चित्रपटात राज कपूर यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती. 

ऋषी कपूर यांनी त्यांच्या करियरमध्ये बॉबी, प्रेमरोग, कभी कभी लैला मजनू, फना व 102 नॉट आऊट या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :ऋषी कपूरनर्गिसराज कपूर