Join us

Rishi Kapoor यांच्या पांढऱ्या केसांचे हे आहे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:17 PM

ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्र यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. या फोटोंमध्ये ऋषी कपूर यांचा एक वेगळाच लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

ऋषी कपूर सध्या आजारी असून उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यांच्या पत्नी नीतू सिंग कपूर देखील गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यासोबतच आहेत. खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून सांगितले होते. त्यांना कुठला आजार झालाय, हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण या बातम्या चुकीच्या असून अद्याप तरी त्यांच्या केवळ टेस्ट सुरू आहेत असे त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते.

ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्र यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. पण हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. या फोटोंमध्ये ऋषी कपूर यांचा एक वेगळाच लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचे केस रंगवलेले असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. ऋषी कपूर यांनी अचानक लूक का बदलला, त्यांनी केसाचा विग लावला आहे का अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. या चर्चांवर ऋषी कपूर यांनीच उत्तर दिले आहे.

ऋषी कपूर यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्यांच्या फॅन्सना सांगितले आहे की, त्यांच्या आगामी चित्रपटाचा हा लूक असून हितेश भाटिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यांनी या पोस्टसोबतच त्यांचे केस डाय करतानाचा एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. माझे केस एका रात्रीत पांढरे कसे झाले असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे मी हे माझ्या फॅन्सना सांगत आहे की अॅवान कॉन्ट्रॅक्टरकडून मी माझे केस डाय करून घेतले आहेत. हनी तरेहान आणि सोनी पिक्चर्सच्या आगामी चित्रपटासाठी माझा हा लूक आहे. चित्रपटाचे नाव अद्याप तरी ठरवण्यात आलेले नाही.

 

या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील ऋषी कपूर यांनी सुरूवात केली होती. या चित्रपटाच्या दृश्यातील एक फोटो पोस्ट करत शर्माजी या माझ्या व्यक्तिरेखेचा हा फोटो असून माझ्या ओरिजनल लूकमध्ये मी लवकरच परतणार असल्याचे त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

 

टॅग्स :ऋषी कपूर