Join us

'द रोमँटिक्स'मध्ये पाहायला मिळणार ऋषी कपूर यांची मुलाखत, १४ फेब्रुवारीला रिलीज होणार सिरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 5:42 PM

नेटफ्लिक्सने चार भागांची डॉक्यु सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे.

हिंदी सिनेमा क्षेत्रातले आयकॉन मानले गेलेले ऋषी कपूर नेटफ्लिक्सच्या द रोमँटिक्स या जागतिक डॉक्यु- सीरीजमध्ये दिसणार आहेत. ही सीरीज प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा, वायआरएफचा वारसा आणि गेल्या ५० वर्षांत त्यांनी भारतीय पॉप संस्कृतीवर तयार केलेला प्रभाव उलगडणार आहे.  

 ऋषी कपूर यांनी यश चोप्रा आणि नंतर आदित्य चोप्रा यांच्यासोबत त्यांच्या कभी कभी, चांदनी, जब तक है जान (ज्यात ते आपली पत्नी नीतू कपूरसोबत दिसले होते), फना, हम- तुम अशा यशस्वी सिनेमांत काम केलं होतं. द रोमँटिक्समध्ये ऋषी कपूर यश चोप्रा यांच्यासोबतच्या  नात्याविषयी, त्यांच्या गाजलेल्या दिग्दर्शक- अभिनेता जोडीविषयी आणि विशेषतः रोमँटिक क्लासिक्सविषयी बोलताना दिसतील.

नेटफ्लिक्सने चार भागांची डॉक्यु सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये ३५ व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती पाहायला मिळणार असून त्यात शाहरूख खान, आमीर खान, सलमान खान, हृतिक रोशन, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा अशा वायआरएफच्या गेल्या ५० वर्षांच्या काळात काम केलेल्यांचा समावेश आहे.

 

विशेष म्हणजे, यश राज फिल्म्सचे सुप्रसिद्ध प्रमुख आदित्य चोप्रा यांनीही त्यांची पहिली ऑन- कॅमेरा मुलाखत ‘द रोमँटिक्स’साठी दिली आहे. रोमँटिक्सच्या ट्रेलरला सर्व थरांतून प्रशंसा मिळत आहे. सिलसिला, लम्हे, कभ कभी, वीर झारा, दिल तो पागल है, चांदनी, जब तक है जान अशा रोमँटिक सिनेमांची निर्मिती केल्यामुळे भारतात ‘फादर ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यश चोप्रा यांना आदरांजली म्हणून नेटफ्लिक्सद्वारे १४ फेब्रुवारी २०२३ चे औचित्य साधून भारतात द रोमँटिक्स प्रदर्शित केली जाणार आहे. द रोमँटिक्सचे दिग्दर्शन ऑस्कर आणि एमी नॉमिनेटेड स्मृती मुंध्रा यांनी केले असून इंडियन मॅचमेंकिग आणि नेव्हर हॅव आय एव्हरच्या यशस्वी फ्रँचाईझीनंतर त्या आणखी एक यशस्वी प्रकल्प घेऊन आल्या आहेत.

टॅग्स :ऋषी कपूरआदित्य चोप्रा