Join us

निधनानंतर ऋषी कपूर यांना इंटरनेटवर ‘शोधताहेत’ चाहते; 7000 टक्क्यांनी वाढला सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 2:16 PM

 होय, निधनानंतर ऋषी कपूर यांचे नाव मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर सर्च केले गेले. 

ठळक मुद्देऋषी कपूर सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर प्रचंड सक्रिय होते.

विविधांगी भूमिकांद्वारे आपली छाप सोडणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे बॉलिवूड शोकमग्न झालेत. चाहते हळहळले. सोशल मीडियाही शोकाकूल झाला.  ऋषी कपूर जग सोडून गेलेत पण गेल्यानंतरही त्यांनी एक छोटाशा विक्रम नोंदवलाच. होय, निधनानंतर त्यांचे नाव मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर सर्च केले गेले.  ऋषी कपूर यांचे निधन झाले, त्यादिवशी त्यांच्यासाठी 14,394 ट्विट केले गेलेत. केवळ इतकेच नाही तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाच्या ऑनलाईन सर्चमध्ये 7000 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. जागतिक स्तरावर यात 6700 टक्क्यांवर वाढ दिसली.

सर्वाधिक वापरला गेला शॉकिंग इमोजीऋषी कपूर यांच्या निधनाच्या दिवशी शॉकिंग इमोजी सर्वाधिक वापरला गेला. होय, ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त करणा-या पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आणि या पोस्टमध्ये 2988 लोकांनी शॉकिंग  इमोजीचा वापर केला. दुस-या क्रमांकावर ब्रोकेन हार्ट इमोजीचा तर तिस-या क्रमांकावर रडणा-या इमोजीचा वापर केला गेला. चौथ्या क्रमांकावर डाव्या डोळ्यांतून अश्रूंचा इमोजी यूज झाला आणि यानंतर बुके आणि ब्रोकेन ब्लॅक हार्ट इमोजी वापरला गेला.

ऋषी कपूर सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर प्रचंड सक्रिय होते. सोशल मीडियावर सक्रिय असणा-या ऋषी कपूर यांनी दोन एप्रिलनंतर ट्विटरवर कोणतीही पोस्ट टाकलेली नव्हती. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसल्याचा अंदाज गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर, बुधवारी अचानक त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी आली आणि  श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आल्याचे सांगितले गेले. दुस-या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी 30 एप्रिलला रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला़.  

टॅग्स :ऋषी कपूर