Join us

'आई कुठे काय करते'मध्ये ऋषी सक्सेनाची एन्ट्री; 'या' भूमिकेत झळकणार 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:47 IST

Rishi Saxena: या मालिकेच्या निमित्ताने ऋषी ६ वर्षानंतर पुन्हा मालिकेत काम करणार आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते (aai kuthe kay karte). या मालिकेत आतापर्यंत अरुंधतीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यामुळे दररोज येणाऱ्या या ट्विस्ट आणि टर्न्समुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय झाली. यामध्येच आता या मालिकेत 'काहे दिया परदेस' फेम एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.

आतापर्यंत या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले. तर, काहींनी ही मालिका अर्ध्यावर सोडली. यामध्येच आता 'काहे दिया परदेस' फेम लोकप्रिय अभिनेता ऋषी सक्सेना (Rishi Saxena) याची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. तब्बल सहा वर्षानंतर ऋषी मालिका विश्वात पुन्हा पदार्पण करत आहे.

ऋषी साकारणार 'ही' भूमिका

'आई कुठे काय करते' या मालिकेत ऋषी, मिहीर शर्मा ही भूमिका साकारणार आहे. मिहीर एक शेफ असून त्याची आई अरुंधतीची मोठी चाहती होती. त्यामुळे आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं अशी तिची इच्छा होती. आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडे गाणं शिकायला येतो.

दरम्यान, या मालिकेच्या निमित्ताने ऋषी ६ वर्षानंतर पुन्हा मालिकेत काम करतोय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब असून चाहते त्याला पुन्हा एकदा मालिकाविश्वात पाहण्यास उत्सुक झाले आहेत.

टॅग्स :ऋषी सक्सेनाआई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेतासेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन