Join us

Ved Marathi Movie: करिना कपूरला ही रितेश देशमुखनं लावलं 'वेड', म्हणाली-ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 3:12 PM

‘वेड' या रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या सिनेमाने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. दरम्यान करिना कपूरचा रितेशमुखसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Ved Marathi Movie  : रितेश देशमुख (Riteish Deshmukh )आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ हा मराठी सिनेमा गेल्या शुक्रवारी (30 डिसेंबर) प्रदर्शित झाला. रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे. शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. दरम्यान रितेशनं नुकताच एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

या व्हिडीओत रितेश देशमुखसोबत अभिनेत्री करिना कपूर दिसतेय. यात चक्क करिना रितेशसोबत मराठीत बोलताना दिसतोय. रितेश करिनाला विचारतो, ''तुझ्यासाठी वेड म्हणजे काय?, वेड म्हणजेच तुझा सिनेमा, एक नशा आहे प्रेमात असते. ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही.'' तसेच ती यासिनेमासाठी रितेशला शुभेच्छा देतानाही दिसतेय. तर रितेशने करिनाचे आभार मानलेत. 

‘वेड’ या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.  अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित झाल्यानं सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार ओपनिंग करत, महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचवं स्थान मिळवलं.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.50 कोटींची कमाई केली होती.  नव्या वर्षात वेड हा सिनेमा आणखी कमाई करेल यात काही शंका नाही.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखकरिना कपूरजेनेलिया डिसूजा