बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक गोष्टी समोर येतायेत. कंगणा राणौतने तर सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेला असा थेट आरोप केला आहे. सुशांत नेपोटिझमचा बळी ठरला. अनेक मोठ्या बॅनर्सनी सुशांतला बॅन केले होते अशी माहिती आता समोर येते आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. अनेक लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचीदेखील गुरुवारी 18 जूनला सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली आणि वांद्रे पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान रियाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार त्यांनी वांद्रे पोलिसांनी रियाच्या चौकशीचा संपूर्ण तपशील दिला आहे.पोलीस अधिकारी : आपलं पूर्ण नाव?रिया : रिया इंद्रजीत चक्रवर्ती ...
पोलीस अधिकारी : तुमच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा?रिया : माझा जन्म बेंगळूरू येथे झाला... माझे शालेय शिक्षण पंजाब मिलेट्री कॅंटमध्ये झाले... कारण माझे वडील सैन्यदलात अधिकार पदावर होते... मला एक लहान भाऊ आहे.पोलीस अधिकारी : तुम्ही मुंबईत कसे आलात?रिया : सुरुवातीला मी मॉडलिंग करायची नंतर काही जाहिराती आणि रिएलिटी शो केले. त्यानंतर मला तुनिंगा तुनिंगा या तेलगू सिनेमात काम मिळाले. तिथून पुढे "मेरे डॅड की मारुती" या पहिल्या हिंदी सिनेमात मला महत्वाचा रोल मिळाला. शूटिंगमुळे मी मुंबईतच राहायची. याच चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान 2013 साली माझी सुशांत सिंग राजपूतशी भेट झाली. त्यावेळी सुशांत शुद्ध देशी रोमांस सिनेमा करत होता आणि मी 'मेरे डॅडी की मारुती' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. दोन्ही चित्रपटाचे सेट जवळपास होते आणि तिथेच आमची पहिली भेट झाली. आम्ही वेगवेगळ्या फिल्म सेटवर आणि नंतर पार्टीत भेटत राहिलो आम्ही मित्र झालो आणि आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. आम्ही भेटतच होतो, पण त्यावेळी सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता.
पोलीस अधिकारी : तुमचे शेवटची भेट कधी झाली?रिया : 6 जूनपर्यंत आमची भेट होत होती. त्या दिवशी तो डिप्रेशनमध्ये होता आणि त्याने मला त्याला सोडून एकटे राहण्यास सांगितले. मी एकही प्रश्न न करता त्याच्या अपार्टमेंटमधून निघून गेले. कदाचित काही दिवसात हे सगळे ठीक होईल असा विचार करुन मी तिथून निघून गेले. त्याने स्वत:ला वेळ दिला पाहिजे स्वत: साठी विचार केला पाहिजे. म्हणून मी तिथून निघून गेली आणि त्यानंतर अचानक 14 जूनला सुशांतच्या आत्महत्येबद्दल कळले.पोलीस अधिकारी : सुशांतच्या आत्महत्येमागे काय कारण असावे?रिया : काहीच सांगू शकत नाही. कारण तो कधीच काही शेअर करायचा नाहीपोलिस अधिकारी : सुशांत सिंगच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल काय सांगशील? म्हणजे तो कोणत्या प्रोडकशन हाऊस सोबत काम करायचा? कोणाशी करत होता?रिया: सुशांतने यश राज फिल्मस सोबत काम केले आहे. 2013 मध्ये डायरेक्टर महेश शर्मांच्या "शुद्ध देसी रोमांस", 2015 मध्ये डायरेक्टर दिबाकर बॅनर्जी यांच्या "डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्क्षी" आणि यश राज फिल्मस बॅनरचा तिसरा चित्रपट "पाणी" जो शेखर कपूर दिग्दर्शन करणार होते पण यश राज फिल्मसने अचानक या सिनेमातून माघार घेतली. सुशांत सोबतचा करार देखील यश राज फिल्मसने संपुष्टात आणला ही गोष्ट तशी जुनी आहे.दरम्यान, रियाच्या या जबाबानंतर मुंबई पोलिसांनी यश राज फिल्म्सला एक पत्र लिहिले असून सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत यश राज फिल्मने केलेल्या कराराती प्रत पोलिसांनी मागवली आहेत.