Rohit Shetty Announce: सिंघम, सिंघम रिटर्न, सिंबा, सूर्यवंशीसारख्या हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक रोहित शेट्टीने(Rohit Shetty) त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त IPS राकेश मारिया(Rakesh Maria) यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा रोहितने केली आहे. आज रोहितने राकेश मारिया यांच्यासोबत एक फोटो शेअर करत याची घोषणा केली.
सोशल मीडियावर फोटोसोबत रोहितने कॅप्शन लिहीले, "राकेश मारिया यांनी 36 वर्षांच्या सेवेत दहशतवाद पाहिला. मुंबई सीरियल ब्लास्ट, अंडरवर्ल्डचा धोका, 26/11 मुंबई हल्ला. त्यांचा प्रवास खूप अवघड होता. या प्रवासाला मी मोठ्या पडद्यावर आणतोय. यामुळे मला खूप सन्मान मिळाला आहे."
कोन आहेत राकेश मारिया?राकेश मारिया हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. राकेश मारिया यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठी प्रकरणे सोडवली. 1993 चे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, 2003 मधील गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणाची उकल केल्यानंतर, 2008 च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाबची राकेश मारिया यांनी चौकशी केली होती.
राकेश मारिया यांनीही आनंद व्यक्त केला
दरम्यान, राकेश मारिया पडद्यावर आपले आयुष्य जगण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्यांनी याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. रोहित शेट्टी सारखा तगडा दिग्दर्शक त्याचा जीवनप्रवास पडद्यावर आणणार आहे. रोहित शेट्टी पोलिसांवर आधारित चित्रपट बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने सिंघम, सिम्बा आणि सूर्यवंशी यांसारखी काल्पनिक पात्रे पडद्यावर आणली आहेत. पण आता तो खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पडद्यावर आणत आहे.