रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ (Cirkus ) सिनेमा मोठा गाजावाजा करत रिलीज झाला. पण रिलीज होताच या सिनेमानं प्रेक्षकांची निराशा केली. गेल्या दोन दिवसांतील सिनेमाच्या कमाईचे आकडे प्रचंड निराश करणारे आहेत. देशभरात २३०० स्क्रिन्सवर ‘सर्कस’ रिलीज झाला. पण या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमाचे अपयश इतके की आता रोहित शेट्टीचे विश्वासू सीईओ(CEO) आणि सर्कसचे सहनिर्माता जॉर्ज कॅमेरुन (George cameron) यांनी आता राजीनाला दिला आहे.
अनेक वर्षांपासून जॉर्ज कॅमेरुन हे रोहित शेट्टीच्या प्रोडक्शन हाऊसचा भाग होते. मात्र आता त्यांनी हे प्रोडक्शन हाऊस सोडले आहे. सर्कसच्या निर्मिती वेळीच रोहित आणि जॉर्ज यांच्यात मतभेद झाले होते. अनेक प्रयत्नांनंतरही हे मतभेद दूर झाले नाही. दरम्यान सर्कस रिलीज होण्याआधीच प्रोडक्शन हाऊस सोडण्याचा निर्णय जॉर्ज यांनी घेतला होता.
गोलमाल (Golmaal) नंतर जॉर्ज आणि रोहित प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सोबत काम करत होते. पण आता जॉर्ज हे स्वतंत्र निर्माता बनण्याच्या प्रयत्नात आहेत. सिनेमासाठी कलाकारांच्या तारखा घेणे, त्यांचे मानधन यावर चर्चा करणे या गोष्टी जॉर्ज हेच सांभाळायचे. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. ते पूर्वी सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांचे सेक्रेटरी होते. मात्र अजुनही जॉर्ज यांनी राजीनामा दिल्याचे स्वत: सांगितलेले नाही. या विषयावर बोलायचे नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितले.