‘खतरों के खिलाडी’चे प्रत्येकच सीझन प्रचंड गाजते. या सीझनमध्ये अर्जेंटिनाच्या वन्यप्रदेशात १२ डेअरडेव्हिल चॅलेंजर त्यांची हिंमत तपासून पाहणार आहेत आणि संपूर्णपणे तयारी न करता त्यांच्या जीवनातील सर्वात चांगला परफॉर्मन्स देणार आहेत. थरारकता, साहस, धाडस आणि मनोरंजन आणि अतिशय भीती यांचे एकत्रीकरण असलेला सीझन कलर्स पुन्हा एकदा तुमच्या साठी घेऊन येत आहे, ‘खतरों के खिलाडी’. जिगर पे ट्रिगर ही थीम असलेल्या या मालिकेत पुन्हा एकदा रोहित शेट्टी होस्टची आणि स्टंट आर्किटेक्टची भूमिका या प्रवासात करताना दिसणार आहे. हा शो सुरू होत आहे ५ जानेवारी पासून आणि प्रसारीत होणार आहे प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता फक्त कलर्स वर.
अॅक्शन देव असलेला रोहित शेट्टी शोचा मुख्य असून स्पर्धकांना त्यांच्या आरामदायी जगातून बाहेर ढकलून स्वत:च्या भयानक भीतीचा सामना करून विजयी म्हणून उद्याला येण्यासाठी पुढे ढकलले जाणार आहे. या सीझनमध्ये सेलिब्रिटी स्पर्धकांचे विविधांगी मिश्रण पहायला मिळणार असून ते साहसी आव्हाने स्विकारणार आहेत आणि पोलादी प्रदर्शनातून प्रेक्षकांना दिपविणार आहेत. यातील बिग बॉस प्रसिध्द विकास गुप्ता आणि श्रीनाथ किंवा डान्स सेन्सेशन पुनित पाठक किंवा मोहक शमिता शेट्टी, असो सर्व स्पर्धक कोरीव ट्रॉफी जिंकण्यासाठी लढणार आहेत. आणि यात त्यांना सहभागी होणार आहेत, कॉमेडीतील पहिली टिव्ही महिला भारती सिंग तिचे पती हर्ष लिंबचियासह. टेलिव्हिजनवरील सौंदर्यवती जस्मिन भसीन, रिदिमा पंडित आणि अविका गोर तसेच छोट्या पडद्याची धडकन असलेला अली गोनी, झेन इमाम आणि आदित्य नारायण सुध्दा सामील होणार आहेत. हे सर्व धाडसी खिलाडी मिळून अर्जेंटिना मध्ये उच्च क्षमतेचे स्टंट रोहित शेट्टीच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत.
या सीझनबाबत दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले, ‘अर्जेंटिनाचा अदम्य प्रदेश, स्टंटची उच्च तीव्रता आणि धाडसी स्पर्धक म्हणजे या सीझनचे सर्वकाही आहे. मागील सीझन नंतर यावेळी आम्ही स्टंट अजून एका पातळीवर नेले आहेत आणि ते स्पर्धकांना आव्हान देणार आहेत आणि त्यांना त्यांच्या मर्यादा चाचपता येणार आहेत. मला खात्री आहे की, हा शो प्रेक्षकांना सनसनाटी व विश्वासार्ह मनोरंजन देणार आहे आणि मला स्पर्धकांकडून स्टंट करत असताना जो आनंद लुटता आला तसाच आनंद प्रेक्षकांनाही लुटता येईल.’