'विश्वसुंदरी' किताब पटकावणारी सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तिचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलं आहे. विक्रम भट, ललित मोदी ते १५ वर्ष लहान रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ती रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. रोहमन शॉलला काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांचंही ब्रेकअप झालं. मात्र तरी ते सोबत दिसतात. त्यांच्यात जर प्रेम नाही तर मग काय आहे यावर आता रोहमन शॉलनेच मौन सोडलं आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत रोहमन शॉल म्हणाला, "मी जेव्हा सुष्मिताला भेटलो तेव्हा मला कळलं की ती दिसते त्यापेक्षाही खूप चांगली व्यक्ती आहे. मी तिचा चाहता होतो पण आता प्रेमाचा चाहता आहे. मी तिला प्रचंड मेहनत करताना बघितलं आहे. मी तिच्या बुद्धीचातुर्याचाही चाहता आहे. तिच्या आजूबाजूला काय चाललंय याची तुला पूर्ण माहिती असते. मला तिच्याकडून खूप काही शिकायचं आहे."
यासोबत त्यांच्या रिलेशनशिपविषयी तो म्हणाला, "आम्ही वरण भातासारखे आहोत. आम्ही एकमेकांना पूर्ण समजून घेतो. लोक काय म्हणतात याची आम्हाला अजिबातच चिंता वाटत नाही. मी त्यात पडत नाही. मी लोकांना आमच्या नात्याबद्दल एक्सप्लेन करु शकत नाही पण आमचं एकमेकांशी पटतं आणि हे माझ्यासाठी पुरेसं आहे."
रोहमन शॉलने करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली. २०२० मध्ये त्याने 'अमरन' सिनेमातून पदार्पण केले. सुष्मिता आणि रोहमन यांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्याने सुष्मिताला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. मग त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ते डेट करायला लागले. ते लिव्ह इन मध्येही राहत होते. आता त्यांच्यात नक्की कसं नातं आहे हे अनेकांच्या समजण्याच्या बाहेर आहे.