Join us  

सोनालीसोबत हेमंत करणार रोमँटिक साँग

By admin | Published: March 20, 2016 2:13 AM

विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा सगळ्यांचा लाडका हेमंत ढोमे म्हणे आता रोमँटिक साँग करणार आहे. पोश्टर गर्ल या सिनेमातून त्याने मुली वाचवा हा अप्रतिम

विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा सगळ्यांचा लाडका हेमंत ढोमे म्हणे आता रोमँटिक साँग करणार आहे. पोश्टर गर्ल या सिनेमातून त्याने मुली वाचवा हा अप्रतिम संदेश देऊन एक गंभीर विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. परंतु, रसिकांना त्यामध्ये एक कमी जाणवली आणि ती म्हणजे, सोनाली आणि हेमंतचे रोमँटिक साँग. हेमंतचे चाहते त्याला म्हणतायेत, आम्हाला तुझे अन् सोनालीचे रोमँटिक साँग अजून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळालेले नाही. यावर हेमंत म्हणतोय, नेक्स्ट टाइम रोमँटिक साँग शुअर. आता हे आपण खरंच समजायचं की लवकरच पोश्टर गर्लचा नेक्स्ट पार्ट येतोय ते कळेलच; पण हेमंत आणि सोनालीचे जबरदस्त रोमँटिक साँग आता त्यांच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.