सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेला हल्ला काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. घराजवळ फारशी सुरक्षा नसल्याने आणि सीसीटीव्ही नसल्याने आरोपीने त्याचा फायदा घेत तो थेट सैफच्या मुलांच्या बेडरुमपर्यंत पोहोचला. आरडाओरडा ऐकल्यानंतर सैफ धावत आला. तेव्हा आरोपीने सैफवर चाकूने सपासप वार केले. दरम्यान आता सैफच्या कुटुंबाने सुरक्षेच्या बाबतीत कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अभिनेता रोनित रॉयची (Ronit Roy) सिक्युरिटी एजंसी सैफला सुरक्षा पुरवणार आहे.
सैफ अली खानला आज हल्ल्यानंतर पाच दिवसांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तो बांद्रा येथील आपल्या घरी परत आला आहे. फॉर्च्युन हाईट्समध्ये तो कुटुंबासोबत राहणार आहे. तर त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा सैफ बाजूच्याच सतगुरु शरण इमारतीतील घरात होता. सैफ घरी येताच त्याच्या घराभोवती अनेक पोलिस तैनात दिसले. याचवेळी अभिनेता रोनित रॉयही तिथे दिसला. रोनितची स्वत:ची सिक्युरिटी एजन्सी आहे. हीच आता सैफने घेतली आहे. त्याचा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सैफ अली खानच्या 'सतगुरु शरण' इमारतीतील फ्लॅटवर सुरक्षा जाळ्या लावण्यात येत आहेत. तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही आणखी लावले आहेत. आणखीही काम या घरात होणार आहे त्यामुळे सैफ त्याच्या कुटुंबासोबत बाजूच्या फॉर्च्युन हाईट्समध्ये राहणार आहे. आजच लीलावती हॉस्पिटलमधून त्याला डिस्चार्ज मिळाला असून तो सुखरुप घरी पोहोचला आहे.ो