Join us

एका मुलाची आई असलेल्या घटस्फोटीत महिलेच्या प्रेमात पडले होते राजामौली; थेट बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 5:12 PM

घटस्फोटीत आणि एका मुलाची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात राजामौली पडले होते.

बाहुबली आणि बाहुबली 2 सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता एसएस राजामौली यांना आज कुठल्याही ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार चित्रपटांनी लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजामौली यांचा आज वाढदिवस. 10 ऑक्टोबर 1973 रोजी जन्मलेल्या राजामौली यांचं व्यावसायिक जीवन नेहमीच चर्चेत असते. तर ते आपलं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतात. पण, त्यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे. घटस्फोटीत आणि एका मुलाची आई असलेल्या महिलेच्या प्रेमात राजामौली पडले होते. ऐवढचं नाही तर त्यांनी तिच्याशी थेट लग्नगाठ बांधली.

एसएस राजामौली यांच्या पत्नीचं नाव रमा असे आहे. राजामौली यांच्याशी लग्न करण्यापूर्वी रमा यांचा घटस्फोट झाला होता. शिवाय त्या राजामौली यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या आहेत. तसेच पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगाही आहे. 

 वैवाहिक जीवन सुरळीत नसल्याने रमा यांनी पहिल्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. रमा यांची बहिन श्रीवल्लीचे पती कीरवानी आहेत. जे राजामौली यांचे भाऊ आहेत. कीरवानी यांच्या माध्यमातून रमा यांच्याशी राजामौलीची ओळख झाली होती. यातच त्यांना रमावर प्रेम जडलं आणि त्यांनी थेट लग्नाची मागणी घातली.

राजामौलींनी  2001 मध्ये रमा यांच्याशी कोर्ट मॅरेज केलं होतं.  राजामौली यांनी रमा यांच्या मुलालाही दत्तक घेतलं. कार्तिकेय असे मुलाचे नाव आहे. शिवाय, या जोडप्याने मयुखा नावाची मुलगी देखील दत्तक घेतली आहे. राजामौली हे रमा यांना ते 'चिन्नी' या गोड नावाने हाक मारतात. बायकोवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत.  

टॅग्स :एस.एस. राजमौलीसिनेमासेलिब्रिटी