दक्षिणचे सुपरहिट दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या चित्रपटांची वाट हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकही पाहत आहेत. एस.एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. या सिनेमात राम चरण आणि एनटीआर ज्युनिअरसह बॉलिवूड अभिनेते अजय देवगण आणि आलिया भटही दिसणार आहे. हा सिनेमा 13 ऑक्टोबर 2021ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
आलिया भट यात महत्वाची भूमिका साकारणार आहे. आलियाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर सिनेमाची रिलीज डेट शेअर केली. आरआरआरसाठी तयार व्हा. 13 ऑक्टोबर 2021ला थिएटरमध्ये येतो आहे. असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
आरआरआर हा चित्रपट एक कालखंड नाटक आहे ज्याची कथा ब्रिटिश राजवटीच्या काळात सेट केली गेली आहे. कथेच्या मध्यभागी दोन स्वातंत्र्यसैनिक आहेत, ज्यात राम चरण आणि एनटीआर ज्युनियर आहेत. हा चित्रपट मूळत: तेलगूमध्ये बनविला जात असून हिंदीसह अन्य भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल.
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे.
राजमौली यांनी हा सिनेमा बनवण्यात कोणतीही तडजोड केली नाही. अगदी एका एका सीनवर पाण्यासाखा पैसा खर्च केला. राम चरणच्या एन्ट्री सीनवर राजमौली यांनी 15 कोटी रुपये खर्च केलेत. यानंतर ज्युनिअर एनटीआरच्या एन्ट्री सीनसाठी राजमौलीच्या टीमने 25 कोटींचा बजेट फायनल केला. म्हणजे, केवळ दोन सीनसाठी 40 कोटी रूपये खर्च करण्यात आले. केवळ दोन सीनवर 40 कोटी खर्च करणारा ‘आरआरआर’ हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील कदाचित पहिला चित्रपट आहे.