Join us

मुंबईची लाईफस्टाइल विसरुन 'ही' अभिनेत्री रमली गावच्या वातावरणात; चुलीवर तयार केला आलू पराठा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 4:07 PM

Rubina dilaik: शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रुबिना चुलीजवळ बसली असून ती आईसोबत आलू पराठा करत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री (tv actress) आणि बिग बॉस १४ ची  (Bigg Boss 14) विजेती रुबिना दिलैक (Rubina Dilaik) सध्या तिच्या गावी सुट्टी एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वीच रुबिना तिच्या गावी हिमाचल प्रदेशमध्ये गेली असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. यामध्येच तिने नुकताच एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती चक्क चुलीवर आलू पराठा करताना दिसत आहे. 

सध्या रुबिना मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ उसंत घेत गावी मज्जा करत आहे. निसर्गाच्या सानिध्यात ती तिचा पूर्ण वेळ घालवत आहे. यावेळी ती घरात तिच्या आईला घरकामात मदतदेखील करत आहे.  रुबिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती घरात स्वयंपाक करताना दिसत आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रुबिना चुलीजवळ बसली असून ती आईसोबत आलू पराठा करत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने परिधान केलेले कपडे पाहिल्यावर सध्या हिमाचलमध्ये प्रचंड थंडी असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, रुबिनाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. पडद्यावर वावरणारी रुबिना खऱ्या आयुष्यात प्रचंड साधी असल्यामुळे तिचा हा साधेपणा नेटकऱ्यांना विशेष भावतो. त्यामुळे अनेकांनी तिचा हा व्हिडीओ पाहून 'पहाडी स्वॅग असं म्हटलं आहे.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस