‘RRR’ म्हणजे काय रं भाऊ? राजमौलींनी सांगितला सिनेमाच्या 'या' टायटलचा अर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 04:23 PM2021-12-31T16:23:35+5:302021-12-31T16:27:09+5:30

RRR Film : नव्या वर्षात राजमौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि हो, याचनिमित्ताने  ‘आरआरआर’ या सिनेमाच्या टायटलबद्दलही खुलासा झाला आहे.

s s rajamouli reveals the reason for choosing rrr title on the kapil sharma show- | ‘RRR’ म्हणजे काय रं भाऊ? राजमौलींनी सांगितला सिनेमाच्या 'या' टायटलचा अर्थ...

‘RRR’ म्हणजे काय रं भाऊ? राजमौलींनी सांगितला सिनेमाच्या 'या' टायटलचा अर्थ...

googlenewsNext

एस. एस. राजमौलींनी (SS Rajamouli) बाहुबली बनवला आणि या सिनेमाचं जगभर कौतुक झालं. राजमौलींच्या या सिनेमानं अभूतपूर्व कमाई केली. साहजिकच, ‘बाहुबली’नंतर राजमौली ‘आरआरआर’ नावाचा सिनेमा (RRR Film) घेऊन येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
 नव्या वर्षात राजमौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि तो पाहायला सगळेच सिनेप्रेमी आतूर आहेत. तूर्तास या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि हो, याचनिमित्ताने  ‘आरआरआर’ या सिनेमाच्या टायटलबद्दलही खुलासा झाला आहे. होय, ‘आरआरआर’ हे नाव ठेवण्यामागच्या कारणांचा खुलासा खुद्द राजमौलींनी केला आहे.

लवकरच राजमौली ‘आरआरआर’च्या स्टारकास्टसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) येणार आहेत. या शोमध्ये राजमौलींनी सिनेमाला ‘आरआरआर’ हे नाव ठेवण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, ‘सुरूवातीला चित्रपटाचं नाव काय ठेवावं, हा विचार सुरू होता. अशात  हा प्रोजेक्ट आरआरआर या रूपात लोकांसमोर आणण्याचा विचार आमच्या डोक्यात आला. राम चरण (Ram Charan) , रामा राव (Jr. NTR)आणि राजमौली म्हणून आम्ही आरआरआर हा हॅशटॅग वापरणं सुरू केलं आणि याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून आम्ही सिनेमाला सुद्धा आरआरआर हे नाव दिलं. ’

‘आरआरआर’ या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाचे आकडेही थक्क करणारे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सिनेमाचं शूटींग सुरू होते आणि एका दिवसाचा खर्च किती तर दरदिवसाला 75 लाख रूपये खर्च होत होते. याचे कारण म्हणजे, शूटींगमध्ये हजारो कर्मचाºयांचा सहभाग होता. 
राजमौलींच्या या सिनेमात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अजय देवगण आणि आलिया भट हे दोन बडे स्टारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनाचे वाढते रूग्ण आणि यामुळे अनेक राज्यात जारी करण्यात आलेले निर्बंध याऊपरही हा सिनेमा येत्या 7 जानेवारी रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे. 

Web Title: s s rajamouli reveals the reason for choosing rrr title on the kapil sharma show-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.