Join us

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स: Top 6 मध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये उद्या रंगणार महाअंतिम सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 15:59 IST

Sa Re G M P Little Champs: कोण होईल यंदाच्या पर्वाचा विजेता?

झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या सिंगिंग रिअॅलिटी शो ला प्रेक्षकांनी कायमच भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे अनेक पर्व गाजले असून लवकरच यंदाच्या पर्वाला त्यांचा लिटिल चॅम्प्स मिळणार आहे.  उद्या म्हणजेच २५  नोव्हेंबरला सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक धुरंदर छोटे स्पर्धक असल्यामुळे महाअंतिम सामना खूप रोमांचक असणार हे नक्की. मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे या ६ स्पर्धकांमध्ये हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 

या पर्वाच वैशिष्ट्य म्हणजे गुरुकुल, संपूर्ण पर्व हे स्पर्धक या गुरुकुलात रियाज करत होते. या स्पर्धकांना खास ‘सलील कुलकर्णी’ आणि ‘वैशाली माढे’ यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे उद्या रंगणाऱ्या महाअंतिम सोहळ्याचा निकाल काय असेल? कोण जिंकेल 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्सची ट्रॉफी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हा महाअंतिम सोहळ्या २५ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता रंगणार आहे. 

टॅग्स :सा रे ग म पटेलिव्हिजनसलील कुलकर्णी